महेश शिंगोटे प्रतिनिधी-रोकठोक न्यूज पारनेर.
माय माती माणूस वर प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व,एक आदर्श कुटुंब प्रमुख,समाजकारण ची जान अन् राजकारणाची नाडी ओळखणारा अवलिया .वडील गंगाधर मोरे पाटील शेती माती , सेणा मुतात राबणारे शेतकरी .कष्टाने अन् घामाने शेती बागायत करून बागायतदार ही बिरुदावली ही दागिण्या प्रमाणे मिरवली कारण ती त्यांची कष्टाने मिळवलेली विरसात होती.
दिवंगत श्री सोन्याबापू हे गंगाधर मोरे पाटील परिवारातील जेष्ठ व्यक्तिमत्त्व ,तीन भाऊ अन् सहा बहिणी चे परिवाराचा हा नावाडी कुटुंबाला दिशा देनेचे सुकाणू नेहमी आपले हाती ठेऊन आदर्श असे कुटुंब घडवले .अकाली मातृ छत्र हरपले तरी पण सहचारिणी चे साथी ने परिवार एका उंचीवर नेला .गावातील प्रथित यश मान्यवर असे धार्मिक सामाजिक क्षेत्रात वावर असणारे दिवंगत श्री विठोबा पानसरे यांचे मुलीशी संसार गाठ बांधली गेली. एकत्र कुटुंब ला एका सूत्रात बांधून वडिलांचा बागायती चा वारसा पुढे चालू ठेवला .
आज ही त्यांचे बांधावर फुललेली झाडे त्यात चींचेची अनेक झाडे डौलाने उभी आहेत .संसार वेलीवर उमललेल्या फुलांची प्रगती त्यात चार मुली दोन मुले दुर्दैवाने एक मुलीचे निधन झालेने आज तीन मुली दोन मुलं आप आपले संसार प्रमंच मध्ये आनंदी आहेत .
दिवंगत श्री सोन्याबापू गंगाधर मोरे पाटील यांचे गावातील सामाजिक क्षेत्रात योगदान मोठे आहे.शिक्षण ,पाणलोट क्षेत्रात विशेष रुची त्यांना होती .पैसे वाचून कुणाचे शिक्षण मध्ये बाधा येऊ नये या साठी अनेकांना आर्थिक मदत करून त्यांचे जीवन सुखकर केले है वास्तव आहे .ज्या विभुतीना मदत केली ते आज ही गौरवाने त्यांचे नाव घेऊन भाऊक होत आहेत
पाणी अडवा पाणी जिरवा ही सरकारची महत्वकांक्षी योजना .त्या योजनेचा आराखडा तयार करून शेरिकोल दरा चा पाझर तलाव साठी पाठपुरावा अन् प्रयत्नाचा प्रपंच त्यांनी मांडला अन् पूर्णत्वास नेला .आज शेरिकोल दरा परिसर जल समृध्द झाला हे आदरणीय दिवंगत सोन्याबापू मोरे पाटील यांचे अन् यांचेच योगदान आहे .
सत्तर ते ऐंशी चे दशका मध्ये गावातील जे राजकारणातील कारभारी होते त्यातील शिक्षित ,नम्रता अन् विषयाची व्याप्ती पाहून योग्य मांडणी करणेचे कसब त्यांचे कडे असले मुळे तहसील दार ते प्रांत ,जिल्हाधिकारी पर्यंत संवाद करणेची कला त्यांचेत होती .
गावचे सरपंच पद अनेक अडथळे पार करून आप्त स्वकीय शी संघर्ष करून मिळवले .लोकशाही आदर्श मूल्यांची सांगड घालून तत्कालीन गाव कारभारी ना सोबत घेऊन गावचा शाश्वत विकास अन् गावचे जडण घडी मध्ये मोलाचे योगदान दिले. शिक्षण ना प्रती असणारी अस्था त्या मुळे अनेक वर्ष स्थानिक स्कूल कमिटी चे सदस्य राहिले .सरपंच पदावर काम अन् विकासाचे दृष्टी ने असा काही पगडा राहिला की सरपंच पद वरून पायउतार झालेवर पण माजी सरपंच हे बिरूद शेवटचे श्वास पर्यंत कायम राहिले अन् त्यांनी पण ते आयुष्य भर जपले. माजी जरी झाले तरी त्यांचे कालखंड तील सरपंच पद चे काम अन् आब कायम राहिला .
आदरणीय माजी सरपंच सोन्याबापू गंगाधर मोरे पाटील यांचे अकाली निधन हे भावकी,गावकी अन् नातेवाईक परिवार साठी वेदना देणारे आहेछत्री ,आम्हा तरुणांचा हक्काचा आवाज अन् मार्गदर्शक हरपला .
जीवनाचे सार एका चार ओळी मध्ये
पुसणार असेल कुणी डोळे तर रडण्यात अर्थ आहे अन् भरणार नसतील कुणाचे डोळे तर मरण सुद्धा व्यर्थ आहे.
आदरणीय माजी तुमचे निधनाची वार्ता ऐकून माझे सह अनेकांचे डोळ्याचे कडा दुखः अश्रू ने ओलावल्या तुमचे जीवन सार्थक झाले .
तुम्हाला साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ...राम कृष्ण हरी
शब्दांकन ..ज्ञानदेव माऊली पानसरे

0 Comments