एव्हरेस्ट कोचिंग क्लासेस, पारनेरचा दहावी परीक्षेचा सलग ४ थ्या वर्षी १००% निकाल

पारनेर प्रतिनिधी 
     पारनेर येथील एव्हरेस्ट कोचिंग क्लासेस ने मार्च २०२३ च्या एस.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली असून या विद्यालयाचा १००% निकाल लागला. याही वर्षी मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

      एकूण ३० विद्यार्थी परिक्षार्थी म्हणून असताना १४ विद्यार्थी ९०℅ पेक्षा जास्त व २३ विद्यार्थी ८०℅ गुण पेक्षा जास्त मिळवून उत्तीर्ण झाले. गुणानुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे- प्रथम ५ गुणवंत विद्यार्थी १. भक्ती येणारे ९६ % (न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर द्वितीय) २. सायली भगत ९५.२० % ( न्यू इंग्लिश स्कूल, पारनेर तृतीय) ३. पार्थ कोकाटे ९३.६०% ४. समृद्धी रेपाळे ९२.६०% ४. ऋषिकेश चौधरी ९२.६०% ५. सिद्धात अौटी ९२.२०% ५. वैष्णवी महांडुळे ९२.२०% ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले विद्यार्थी तनय नगरे ९१.६० ( जिजामाता सेमी इंग्रजी स्कूल, पारनेर प्रथम) , सावली अौ टी ९१.६०, सायली बोरूडे ९१.४०, हर्ष बागल ९१, प्रा ची मंगळे ९०.२०, वेदांती कावरे ९०, साई अडसुळ ९० या प्रमाणे गुण प्राप्त केले. या पारनेर येथील एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे अनेक विद्यार्थी यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत,NMMS, स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, army, nevy भरती मध्ये निवड झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एव्हरेस्ट कोचिंग क्लासचे संचालक प्रा. चेतन साळवे हे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात निवडी होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त होत आहेत.

Post a Comment

0 Comments