पिंपरी जलसेनमध्ये १९९३ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

तब्बल ३० वर्षांनी एकत्र जमला मित्रपरिवार ; आजी-माजी शिक्षकांचा केला सन्मान 



पारनेर चंद्रकांत कदम

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सन 1993-94 च्या इयत्ता सातवीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा पिंपरी जलसेन येथे बुधवारी (दि.१६) पार पडला. यावेळी आजी-माजी शिक्षकांचा देखील सन्मान या विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.


         ज्या शिक्षकांमुळे आपण आयुष्याच्या अनेक पदावर पोहोचलो आहे त्या सर्व शिक्षकांचा सन्मान करून त्यातून उतराई होण्यासाठी व जुन्या मित्रांची एकत्र भेट होऊन चर्चा करण्याच्या निमित्ताने हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. आतापर्यंत अनेक ठिकाणी अनेक स्नेहमेळावे झाले परंतु इयत्ता चौथी व सातवीच्या शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा प्रथमच असा स्नेह मेळावा घेण्यात आला. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत केला अशा शिक्षकांचा सन्मान होणं गरजेचं होतं या उद्देशाने पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील जिल्हा परिषद मराठी शाळा सन 1993- 94 च्या इयत्ता सातवी मधील माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळावा आयोजित केला होता. 


      सगळे विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना नंदन केलेले शिक्षकांचे कौतुक केले व आशीर्वाद घेतले सध्या जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे देखील या माजी विद्यार्थ्यांनी कौतुक केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लंके गुरुजी, कार्यक्रमासाठी माजी शिक्षक गागरे गुरुजी, सोनूले मॅडम, देठे सर,गवळी सर,तामखडे बाई,गागरे बाई,विद्यमान जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पिंपरकर सर,रेपाळे सर,भालेकर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप काळे तसेच प्रवीण काळे यांनी केले कार्यक्रमासाठी प्रकाश वाढवणे (मेजर) ,पांडुरंग थोरात,बाळशीराम थोरात,रामदास थोरात,अजित कांडेकर ,अरुण भिंगारदिवे ,संतोष साळवे,रामदास काळे ,संतोष परांडे, दत्ता अडसरे,गजानन कदम,बुढन शेख, मोहिनी काळे,संगीता पुणेकर,कविता कांबळे,सुरेखा बोरुडे,कुंदा अडसरे,संजीवनी थोरात इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते. विजय चत्तर यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.


महाराष्ट्रातील आगळावेगळा गुरु- शिष्य मेळावा

आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विद्यार्थी व शिक्षकांचे स्नेह मिळावे पार पडले. ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पाया मजबूत केले असे पहिले ते सातवी पर्यंत शिक्षण देणाऱ्या गुरूंचा सन्मान करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात प्रथमच पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे पार पडला. महाराष्ट्रात प्रथमच असा स्नेह मेळावा पार पडला असून आमच्या माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली प्रगती पाहून व त्यांनी आमचा केलेला सन्मान यामुळे आम्ही भारावून गेलो असून यामुळे यापुढील काळात शिक्षकांना देखील ज्ञानदान करताना बळ मिळणार असल्याचे गौरवोद्गार माजी शिक्षकांनी स्नेह मेळाव्या दरम्यान काढले.

Post a Comment

0 Comments