पारनेरची पोरं लई हुशार ; आर्यन पानमंदला संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण ; राज्यात प्रथम

 


पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील कु.आर्यन राजू पानमंद  याचा नुकताच राजगुरुनगर येथे वार्षिक स्नेहसंमेलनात विशेष सन्मान करण्यात आला.

खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर येथे गत सप्ताहात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी या कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.आर्यन राजू पानमंद  याचा संस्कृत विषयातील विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल मा. प्रदीप कदम(प्राचार्य कॉनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज चिखली) यांच्या शुभहस्ते सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला. आर्यन पानमंद याने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.तसेच त्याला एस. एस. सी. बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के मिळाले. या वार्षिक स्नेहसंमेलनसाठी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच प्राचार्य सुनील जाधव, कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख सुभाष देशमुख, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आर्यन पानमंद याला वर्गशिक्षक सौ.नाईकरे मॅडम,संस्कृत विषयशिक्षक श्री.आंधळे सर व सौ. अग्निहोत्री मॅडम यांनी मार्गदर्शन केले.आपल्या यशात महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,राजगुरुनगर व सक्सेस क्लास, राजगुरुनगर यांचा मोठा वाटा असल्याचे त्याने सांगितले.

Post a Comment

0 Comments