![]() |
| स्कॉलरशिप परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना क्लासचे संचालक प्रा. चेतन साळवे. |
कोचिंग क्लासचे संचालक प्रा.चेतन साळवे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
पारनेर प्रतिनिधी
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य स्कॉलरशिप परीक्षा २०२२ च्या निकालात इयत्ता ८ वी च्या वर्गातील एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे १७ विद्यार्थी पात्र झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. चेतन साळवे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. याच क्लासच्या ५ विद्यार्थ्यांची नुकतीच भारतीय सैन्यदलात निवड झाली असून क्लासच्या उज्वल यशाची परंपरा कायम आहे.
![]() |
| स्टाफ सिलेक्शन मध्ये निवड झाल्याबद्दल रेवन सालके यांचे अभिनंदन करताना प्रा. चेतन साळवे |
महाराष्ट्र राज्य स्कॉलरशिप परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये इयत्ता ८ वी मधील शिकत असणाऱ्या व एव्हरेस्ट कोचिंग क्लास पारनेरच्या १७ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण यश मिळवून पात्र झालेले आहेत. यामध्ये हर्षद डमरे (२३२), वेदांत जगदाळे (२२२), इंद्रनील औटी (२१६), यश रेपाळे (२१०), आदित्य गायकवाड (२०६), साईराज पठारे (२०४), कौस्तुभ मुळे (१९६), सौरभ बुगोर्णी (१८८), जयेश सोबले (१८२), सार्थक थोरात (१८०), तन्मय कांडेकर (१७८), साहिल बोरूडे (१७६), सोमनाथ सोबले (१६८), तेजस चौधरी (१६२), खुशाल नरोडे (१६०), प्रज्वल औटी (१५०), समर्थ औटी (१४४) आदी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन पात्र झाले आहेत. पारनेर येथील एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे अनेक विद्यार्थी यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत, स्पर्धा परीक्षेत, पोलीस भरती, सैन्य दल भरती मध्ये निवड झालेले आहेत. नुकत्याच झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे सुजित थोरात, मनोज कार्ले, प्रवीण पोटे, तन्मय ठुबे, अनिल शेळके तर स्टाफ सिलेकशन मध्ये रेवन सालके आदी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एव्हरेस्ट कोचिंग क्लासचे संचालक प्रा. चेतन साळवे हे विद्यर्थ्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात निवडी होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त होत आहेत.
![]() |
| भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना प्रा. चेतन साळवे. |



0 Comments