१ जानेवारीचे सत्कारातुन गांधीगीरी आंदोलन स्थगित

 



गुंडांच्या यादीतुन नाव वगळण्याचा पारनेर पोलिसांचा निर्णय 

पारनेर प्रतिनिधी

पारनेर पोलीस प्रशासनाकडून गुंड लोकांच्या यादीतुन  रामदास घावटे यांचे नाव वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . तसा अहवाल पारनेरचे  पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे पाठवला आहे .त्यामुळे रविवार  दि . १ जानेवारी रोजी निघोज पोलिस चौकी समोर   गांधीगीरी मार्गाने होणारे( गुंडाचा भव्य सत्कार  ) आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे  सा . कार्यकर्ते भानुदास साळवे यांनी सांगितले . 

सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे

      रामदास घावटे  यांच्या विरोधात कोणतेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नसताना  चार वर्षांपूर्वी  त्यांचे नाव  तत्कालीन पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी  गुंडा रेकॉर्डला  नोंदले होते .  पोलीस ठाण्याची हि अत्यंत  गोपनिय असलेली माहीती   श्री हनुमंत गाडे यांनी एका प्रकरणात घावटे यांच्या विरोधात न्यायालयात सादर केली आहे .या गोपनिय सरकारी माहीतीचा श्री गाडे यांनी स्वतः च्या  बचावासाठी उपयोग  केल्याने रामदास घावटे व   त्यांचे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले होते . त्यामुळे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी निघोज पोलिस चौकी समोर  रामदास घावटे यांचा नागरी सत्कार  करून  गांधीगीरी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता . परंतु सध्याच्या पारनेर पोलिसांनी प्रशासणाने रामदास घावटे यांच्यावरील  दाखल गुन्ह्यापैकी दोन गुन्हे निर्दोष झालेले असल्याने  व त्यांच्या कृती व हालचाली समाजविघातक  नसल्यामुळे त्यांचे गुंडा रेकॉर्ड वरून नाव कमी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचा अहवाल वरीष्ठांना पाठवला आहे . आता केवळ वरीष्ठांच्या मंजुरीची औपचारीकता बाकी राहील्यामुळे नियोजीत गांधीगीरी आंदोलन करू नये अशी विनंती पोलिस प्रशासनाने केल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे . या  गांधीगीरी आंदोलनाला जिल्हा भरातुन मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांचे  पदाधिकारी येणार होते . परंतु हा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याने कार्यकर्त्यांनी येवू नये असे आवाहन लोकजागृती सामाजिक संस्थेचे विश्वस्त भानुदास साळवे , सुनिल चौधरी , शंकर गुंड ,सचिव कांता लंके , यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments