सुदर्शन दरेकर (शिरूर)
शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या खेळाडूंनी जिल्हा व विभाग स्तरावर विविध क्रीडा प्रकारात घवघवीत यश मिळवून राज्य पातळीवर मजल मारली आहे.
प्रशालेतील वैष्णवी युवराज रासकर हिने 54 किलो वजन गटांमध्ये अहमदनगर येथे पार पडलेल्या विभागीय पातळीवरील किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावून राज्य पातळीवर मजल मारली आहे तसेच कार्तिक गोरक्षनाथ पुजारी यांनी सतरा वर्ष वयोगटात विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय ओपन एअर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्तरापर्यंत मजल मारली आहे तसेच कुस्ती स्पर्धेमध्ये समर्थ संजय खेतमाळीस, गवळी कुणाल रेवननाथ ,ढेरंगे प्रजय प्रताप , येलभर संस्कार निलेश याच् जिल्हा पातळीवर निवड झाली आहे तर संग्राम संतोष शेवाळे याने बारामती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत भालाफेक मध्ये जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला तर सायली गणेश सातव हीची लांब उडी मध्ये जिल्हा पातळीवर निवड झाली तसेच गांधी नंदिनी व स्वाती शेडगे यांनी तायक्वांदो या प्रकारात जिल्हा पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला तरआफरीन मण्यार, फलके गौरी व कार्तिक पुजारी यांची कराटे या क्रीडा प्रकारामध्ये जिल्हास्तरावर निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख सचिन रासकर सर, क्रीडा स्पर्धा प्रमुख बारकू येवले सर, क्रीडा शिक्षक भाऊसाहेब करंजुले, मच्छिंद्र बनकर, हरी पवार, संतोषकुमार देंडगे, संदीप तानवडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिलजी बोरा सचिव नंदकुमार निकम, प्रशालेचे प्राचार्य योगेश जैन, उपप्राचार्य प्रकाश कल्याणकर, पर्यवेक्षक बाबुराव कोकाटे, निळकंठ देवळालीकर, पर्यवेक्षिका लकडे मॅडम यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

0 Comments