पारनेर प्रतिनिधी
आर्या संजय चत्तर हिला मार्शल आर्ट ज्यूडो स्पर्धेत मुंबई विभागीय गटात सुवर्णपदक मिळाले असून तिची जानेवारी २०२३ मध्ये अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय ज्यूडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मार्शल आर्ट मधील ज्यूडो या स्पर्धेत १४ वर्षांखालील ३२ किलो वजन गटात डॉन बॉस्को स्कुल डोंबिवली येथील आर्या संजय चत्तर हिने मुंबई विभागीय शालेय ज्यूडो स्पर्धेत नुकतेच सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा माटुंगा येथील आर.ए. पोदार कॉलेज येथे पार पडली. आर्या हिने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवत जानेवारी २०२३ मध्ये अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. आर्या हिला युनिटी मार्शल आर्ट सेंटरचे प्रशिक्षक सुनील वडके, ओंकार कदम, महेश नलावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आर्या हिच्या निवडीबद्दल सर्वच स्तरावरून तिचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहे.

0 Comments