चंद्रकांत कदम - 9️⃣4️⃣2️⃣0️⃣4️⃣6️⃣3️⃣9️⃣2️⃣8️⃣
कॉलेजवयीन जीवनात पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून देत सुरू झालेला संघर्षमय प्रवास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पारनेर तालुकाप्रमुख पदापर्यंत पोहोचला आहे. हा संघर्षमय प्रवास दुसरा-तिसरा कोणाचा नसून पारनेर तालुक्यातील पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांचा आहे.
१९ डिसेंबर हा डॉ श्रीकांत पठारे यांचा जन्मदिवस. लहानपणापासून समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या या तरुणाने महाविद्यालयीन शिक्षणापासून युवकांचे संघटन करून त्यांना सर्वोत्तपरी मदत करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी दशेत असताना पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अनेकदा रस्ता रोको आंदोलन केले. डॉ. शंकरराव भोई यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांनी कै. पंढरीनाथ गोपाळराव पठारे स्मृती प्रतिष्ठान स्थापन करून हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च भागविला. व ते आजही कै. पंढरीनाथ गोपाळराव पठारे स्मृती प्रतिष्ठान व डॉ श्रीकांत पठारे सोशल फौडेशनच्या मध्यानातून समाजातील गोरगरीब व गरजूंना मदत करत आहे. त्यांच्या या समासेवेबद्दल त्यांच्या मूळ वडुले गावात त्यांना बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य करण्यात आले. त्यांचे पारनेर येथे प्रशस्थ व सर्वसोयीनयुक्त ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा पठारे यांनी लाखो रुग्णांवर अल्पदरात उपचार केले आहेत. आजही हक्काचा व कमी खर्चात उपचाराची हमी देणारा एकमेव डॉक्टर म्हणून डॉ श्रीकांत पठारे यांची जिल्ह्याभरात चर्चा आहे.
डॉ पठारे यांच्या सामाजिक कामाची दखल घेत त्यांच्या मूळ गावी पारनेर तालुक्यातील वडूले येथे त्यांना गावातील जनतेने बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य केले. त्यांच्या सामाजिक कामांमुळे पारनेर तालुक्यात त्यांच्या नावाची चर्चा अग्यक्रमाणे होत होती. लहानपनासून चळवळीतील कार्यकर्ता असल्याने शिवसेना पक्षावर विशेष आवड व निष्ठा होती. त्यांच्या या कामाची दखल तत्कालीन पारनेरचे आमदार विजयराव औटी यांनी घेत त्यांना शिवसेनेकडून २०१७ मध्ये पंचायत समितीची उमेदवारी दिली. डॉ पठारे यांचा जनमानसातील असलेला संपर्क व सर्वसामान्यांसोबत असलेली नाळ व बांधिलकी यामुळे त्यांनी एकहाती सर्वधिक मताधिक्याने जवळा पंचायत समिती गणात विजय मिळवला. पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर त्यांची जबाबदारी आणखी वाढली. त्यानंतर च्या काळात पंचायत समिती गणासोबत जिल्हा परिषद गट व संपूर्ण पारनेर तालुक्यातील जनतेचा ओढा डॉ पठारे यांच्याकडे वाढला. आपल्या हक्काच्या माणसाकडून उपचार करून घेणे असो किंवा कुठलेही प्रशासकीय कामे अथवा वैयक्तिक कामे मार्गी लावणे या सर्व कामांसाठी दैनंदिन जनतेची गर्दी डॉ पठारे यांच्या पारनेर येथील ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे व्हायला लागली. याच जागेवरून डॉ पठारे हे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देऊ लागले. पंचायत समिती स्तरावर तुटपुंज्या निधीतून विकास कामे व जनतेच्या गरजा पूर्ण होत नसल्याने डॉ पठारे स्वतःच्या पदर खर्चातून जनतेची कामे करायला लागले. मध्यंतरी कोरोनाच्या काळात संपूर्ण जगाला कोरोनाच्या भीतीने घरात बसावे लागले. आशा परिस्थितीत डॉ श्रीकांत पठारे यांनी शिवसेना पक्षाने सर्वात आधी तालुक्यात व राज्यात कोरोना सेंटर उभे करून तालुक्यातील जनतेला मायेचा आधार व उपचार केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉ श्रीकांत पठारे यांनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटरच्या माध्यमातून अतिशय सिरीयस रुग्णांवर ऑक्सिजन व तत्सम अतिदक्षता साधनांद्वारे तालुक्यातील हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले. कोरोना काळापासून डॉ श्रीकांत पठारे यांनी रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. याचबरोबर आषाढी वारीसाठी पंढरपूर ला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना थेट करमाळा तालुक्यातील टेंभुर्णी येथे जाऊन हजारो वारकऱ्यांची मोफत आरोग्यतपासनी व उपचार केले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये वडाच्या झाडांचे वृक्षारोपण अभियान डॉ पठारे यांनी राबविले. डॉ श्रीकांत पठारे यांच्या या कामाची दखल घेऊन तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुजय विखे पाटील यांसह राज्यातील नेते मंडळींनी डॉ पठारे यांचे कौतुक देखील केले.
कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून कोव्हिड रुग्णांची केलेली सेवा व सामाजिक कामे यांची चर्चा जिल्ह्यासह राज्यभरात होऊ लागली. स्वतःचे खासगी हॉस्पिटल असताना देखील रुग्णांवर मोफत उपचार करणारा डॉक्टर म्हणून डॉ श्रीकांत पठारे यांची राज्यात चर्चा होऊ लागली. मध्यंतरी शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडले. शिवसेनेला अनेक नेते सोडून गेले. त्यावेळी एकनिष्ठ म्हणून डॉ श्रीकांत पठारे माजी आमदार विजयराव औटी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेसोबत राहिले. त्यांच्या या एकनिष्ठेची दखल घेत पक्षनेतृत्वाने त्यांना शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख पद दिले. डॉ पठारे हे "शिवसेना" या चार नावांच्या पक्षाशी एकनिष्ठ असून आजही पारनेर तालुक्यातील गावांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तळागाळातील जनतेवर मोफत उपचार करत आहेत.
डॉ श्रीकांत पठारे यांच्या रूपाने उच्च शिशिक्षित शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख ना. उद्धव ठाकरे साहेब यांनी निवड केल्याने पारनेर तालुक्यात शिवसेनेला पुन्हा एक नवचैतन्य मिळाले आहे. त्यांचे युवकांचे संघटन मोठे असून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून तालुक्यात सर्वत्र त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यांच्या निवडीने पारनेर मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होणार आहे. कोव्हिड काळात जनतेला मोफत उपचार देऊन केलेली सेवा जनतेला भावली असून सामाजिक कामामध्ये डॉ श्रीकांत पठारे यांचे नाव तालुक्यामध्ये अग्यक्रमाणे घेतले जात आहे.
१९ डिसेंबर हा शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांचा जन्मदिवस. त्यांच्या या जन्मदिनी त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छांसह त्यांच्या हातून समासेवेचे हे व्रत असेच आयुष्यभर सुरू राहावे. अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व पुनश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....🌹🌹चंद्रकांत कदम (पत्रकार)






0 Comments