मागण्या मान्य झाल्याने उपोषण स्थगित ...

 

मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण सोडताना उपोषणकर्ते बबन कवाद व भानुदास साळवे .... छाया - चंद्रकांत कदम

पारनेर :  निघोज येथील मळगंगा सहकारी पतसंस्थेच्या विरोधात विविध मागण्यासाठी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात आले . याबाबत अधिक माहिती की निघोज येथील बबन कवाद व भानुदास साळवे यांनी मळगंगा संस्थेच्या अनागोंदी कारभार व थकीत कर्जदारांना पाठीशी घातल्या मुळे संस्थेचा  ताळेबंद अडचणीत येवू शकतो या  कारणावरून उपोषण पुकारले होते. त्यांच्या मागणीप्रमाणे पतसंस्थेकडून थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मागणी मान्य झाल्याने अ तसेच मळगंगा पतसंस्थेने पारनेर सहकारी साखर कारखान्याला सन २००४ मध्ये  कारखान्याच्या पेट्रोल पंपाला  साठ लाख रुपयांचे कॅश  क्रेडिट कर्ज दिले होते . पुढे कारखाना अवसायनात गेल्यामुळे हे कर्ज थकीत झाले .  त्यानंतर या कारखान्याची विक्री झाली . त्यावेळी पारनेर कारखान्याच्या मालमत्तेवरील सर्व कर्ज  देणी भागवण्याची जबाबदारी खरेदीदाराची राहील अशी अट निविदेत होती . अशी अट असताना मळगंगेचे कर्ज कारखाना खरेदीदार क्रांती शुगर यांनी चुकते न करता मालमत्तेचे बेकायदेशीर हस्तांतरण केले होते . यावर पतसंस्थेने  आक्षेप घेतला असता संस्थेला त्यांचे कर्ज फेडण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते . पुढे हे आश्वासन न पाळल्यामुळे संस्थेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला . त्यानंतर   हे कर्ज वर्षभरात  व तिमाहीप्रमाणे  चार टप्यात  फेडण्याचा मळगंगा पतसंस्था व क्रांती शुगर यांच्यात सन २०१८ ला लेखी करार झाला .  परंतु हा करार देखील क्रांती शुगर यांनी पाळला नाही . असे असताना मळगंगा पतसंस्था क्रांती शुगर यांच्यावर मेहरनजर होत होती  व कारवाईस टाळाटाळ करीत होते . त्यामुळे संस्था अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती म्हणून संस्थेचे सभासद बबन कवाद व भानुदास साळवे यांनी संस्थेकडे क्रांती शुगर च्या कर्ज वसुलीची मागणी केली परंतु त्यास संस्थेकडून प्रतिसादात मिळत नव्हता . म्हणून त्यांनी हे उपोषण पुकारले होते .

 त्यांनी पारनेर येथील सहकार सहायक निबंधक कार्यालया समोर उपोषण चालु केल्यानंतर संस्थेने त्यांच्या मागणीप्रमाणे निर्णय घेतल्याने उपोषण स्थगित करण्यात आले .


 पारनेर कारखान्यासाठी महत्वाचा निर्णय ... 

पारनेर कारखान्याकडे १४० एकर जमीन आज रोजी शिल्लक आहे . ती मळगंगा संस्थेने कर्जामुळे जप्त केली होती . कारखाना विक्री करारानुसार ते कर्ज फेडण्याची जबाबदारी क्रांती  शुगर यांची असल्याने आमची संस्था त्यांचेकडून वसुल करील व पारनेरची १४० एकर  जप्त केलेली जमीन पुन्हा कारखान्‍याला देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे . व  तसा ठराव संचालक मंडळाने घेतला आहे . त्यामुळे संस्थेच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व उपोषण स्थगित करत आहोत .

 भानुदास साळवे,बबन कवाद  उपोषणकर्ते 







Post a Comment

0 Comments