सभासदांनी पारनेर कारखाना ताब्यात घ्या : माजी आ. माणिकराव जाधव

पारनेर कारखान्याची विक्री बेकायदेशीरच ; शेतकरी - कामगार महासंघाची देवीभोयरेत बैठकित सभासदांचा एल्गार


पारनेर प्रतिनिधी
 पारनेर सहकारी साखर कारखान्याची विक्री बेकायदेशीर झाली असून हा कारखाना सभासदांचाच आहे असा एल्गार करत लवकरच सभासद,शेतकरी व कामगार पारनेर कारखान्याचा ताबा घेणार असल्याची घोषणा देवीभोयरे  येथील शेतकरी कामगार महासंघाच्या बैठकीत करण्यात आली . राज्य सहकारी बँकेतील  घोटाळा उघड करणारे शेतकरी -  कामगार नेते माजी आमदार माणिकराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थित ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभासदांनी व शेतकऱ्यांनी एल्गार केला.
पारनेर सहकारी साखर करण्याच्या सभासदांना मार्गदर्शन करताना शेतकरी -कामगार नेते माणिकराव जाधव. समवेत मान्यवर .. छाया - चंद्रकांत कदम

      राज्य सहकारी बँकेने किरकोळ कर्जासाठी पारनेर साखर कारखान्याची बेकायदेशीर  विक्री केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.  पारनेर कारखान्याची  विक्री नसून तो क्रांती शुगरचा  अतिक्रमण  व कब्जा   असल्याचा घनाघाती आरोप माजी आमदार जाधव यांनी यावेळी केला . हा ताबा मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेची ताकद पारनेर कारखान्याच्या सभासदांना व शेतकऱ्यांना देणार असून  अतिक्रमण काढल्यासारखा हा ताबा उलथवुन टाका असे आवाहन जाधव यांनी पारनेरकरांना केले. राज्य सहकारी बँकेच्या चौकशी अहवालात पारनेर कारखान्याला बेकायदेशीर विकल्याचा ठपका देखील ठेवण्यात आल्याचे त्यांनी  सांगितले . पारनेर प्रमाणे राज्यातील इतर  ४९ सहकारी कारखाने या बँकेने विकले  आहेत .  मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानंतर या बॅकेच्या संचालक मंडळावर  गुन्हा दाखल झाला आहे . सुप्रीम कोर्टानेही या गुन्ह्याला स्थगिती नाकारली आहे . आता  या गुन्ह्याचा तपास सध्याचे राज्य सरकार  करू इच्छित आहे .आधीचा तपास  मागे घेत असल्याचे सरकारने न्यायालयात  म्हणणे मांडले होते परंतु सरकारचे हे म्हणणे याचिकाकर्ते यांना मान्य नाही . आधी तो  तपास चुकीचा असल्याने  रद्द करा, मगच नव्याने तपास करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले .  

      पारनेर कारखान्याचे अस्तित्व आजही अबाधीत  असून कारखान्याचे  अवसायनातुन   पुनर्जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी बचाव समितीचा प्रयत्न उचित असून ,  त्यांच्या मागणीला शेतकरी महासंघाचा पाठिंबा असल्याचे  जाहीर केले .आता कारखान्याचा ताबा घेताना तुमचे पारनेरचे आमदार निलेश लंके सभासदांची की  क्रांती शुगरची बाजू घेणार हे आता तुम्हाला पहावे लागेल .   राज्यातील विक्री झालेले साखर कारखाने तेथील सभासद हळूहळू ताबा घेणार आहेत.  त्यासाठी मी  जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याचे शेतकरी- कामगार नेते माजी आमदार माणिकराव जाधव यांनी सांगितले.  राज्यातील पारनेर कारखाना प्रथम ताब्यात घेण्यात येईल असा ठराव देखील या बैठकीत शेतकऱ्यांनी व सभासदांनी केला .यावेळी कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे , बबनराव कवाद यांनी पारनेरच्या विक्रीतील भ्रष्टाचाराबाबत  माहिती दिली व आम्हाला पारनेर ताब्यात घेण्यासाठी राज्यातील महासंघाने  मदत आमच्या मागे उभी करावी अशी मागणी देखील जाधव यांच्याकडे केली . हा कारखाना ताब्यात घेवून उत्तम चालवुन दाखवू असा आत्मविश्वास बचाव समितीचे रामदास घावटे यांनी व्यक्त केला . यावेळी भाऊसाहेब खेडेकर, पांडुरंग पडवळ , रामदास कवडे , कृष्णाजी बडवे , जालींदर सालके , ओंकार सालके, संकेत शेळके , अमोल ठुबे  ,भाऊ पानमंद ,पोपट लंके , शिवाजी क्षिरसागर  ,संपतराव वाळुंज ,सुभाष बेलोटे ,विठ्ठल कवाद ,शंकर गुंड , रघुनाथ मांडगे, संभाजीराव सालके , बबनराव सालके ,गोविंद बडवे , ज्ञानदेव पठारे , दत्ता भुकन , बाबाजी गाडीलकर ,श्रीधर गाडीलकर ,शंकर तांबे, एकनाथ गुंजाळ भानुदास साळवे , दिगंबर घोगरे , दत्ता पवार , शिवाजी पवार , बाबुराव मुळे यांच्यासह अनेक  शेतकरी कामगार उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments