लाईनस्टाफच्या रोजच्या अपघात,कर्यवाही विरोधात,उठाव करण्यासाठी, क्रांतिकारी लाईनस्टाफ सेनेची स्थापना

लाईनस्टाफचे सुरक्षेअभावी विजअपघात होऊन संसार उद्ध्वस्त होत आहे,तंत्रज्ञांवर नियम बाह्य पद्धतीने अतांत्रिक कामें लाधली जात आहेत. कार्यवाही केल्या जात आहेत म्हणजे एक प्रकारे शारिरिक मानसिक छळ महावितरण तंत्रज्ञवर्गावर चालू आहे. हाच आक्रोश मांडनारी आणि यावर न्यायमागनारी शहीद भगतसिंग विचारधारेची क्रांतिकारी लाईनस्टाफ सेना नावाची संघटना दी.०२/०९/२२ रोजी स्थापन झाली असून या संघटनेचे बोधचिन्ह ,झेंडा उद्घाटन नुकतेच धाराशिव येथे मा.खासदार श्री.ओमराजे नींबाळकर यांच्या हस्ते शेकडो लाईनस्टाफच्या उपस्थितीत करण्यात आले.


याबाबत् सविस्तर असे की, महावितरण(MSEB) मध्ये ८६ हजार विज कर्मचारी, अधिकारी, अभियंते आहेत, त्यापैकी सर्वात जास्त संख्या ही लाईनस्टाफ (वायरमन) ४२ हजाराहून अधिक आहे, त्यात २६ हून अधिक संघटना व्यवस्थापनाकडून कामगारांच्या प्रश्नासाठी आमंत्रित केल्याजावूनही,लाईनस्टाफ बांधवांचे प्रश्नसोडविण्यात त्यांना आजपर्यंत अपयशच आले, पगारवाढ असो वा नुकतेच दिवाळीत जाहीर झालेले सानुग्रह अनुदान/बोनस असो,आमचा लाईनस्टाफ  २४/७ तास उन वारा पाऊसात स्वतःच्या जिवाची बाजी लावून काम करतो,असे सांगायचे व लाईनस्टाफच्या नावाखाली आपलीही पोळी भाजायची ही प्रस्थापित संघटनांची कायमची खेळीच झाली होती.


   कंपनीचे कुठल्याही प्रकारचे काम असो उदा.0 ते ३०ग्राहक तपासने,२% - ५%चेकरिडिंग करणे, R,C,I,AG ग्राहकांचे रिडींग घेने व विजबिले वाटप करणे, मिटर, रोहीत्र बसविने, ब्रेकडाऊन काढणे, मेंटेनन्स करणे ह्या कामासाठी एजन्सी असतांना देखिल ठेकेदारांना हाताशी धरून हे कामे लाईनस्टाफ बांधवांवर बळजबरीने लादून न केल्यास, शिस्तभंग कार्यवाही करने, CR खराब करने, ⅓पगार कपात करणे,सोशल मिडीयाचा गैरवापर करून रात्री अपरात्री कामावर बोलविने, विजबिल वसुलीसाठी ग्राहकांना कुठलीही पुर्व नोटीस न देता वीजपुरवठा खंडीत करणे,अधिकाराचा गैरवापर करून निलंबित करने,सुट्टीच्या अथवा रजेच्या दिवशी कामावर बोलाविने या ना विविध कारणे पुढे करून मानसिक व शारीरिक त्रास देने, हे रोजचेच कार्य सुरू झाले, यावर प्रस्थापित संघटनानी मात्र चुप्पिच धरली, यासंघटनांचे फक्त आणि फक्त एकच काम पतसंस्थाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा कुठलीही पुर्व सूचना न देता सरळ पगारातून संघटना देनगी, फी, पगारवाढ पावती, अधिवेशन, मेळावा यांसारख्या अनेक कपाती राज्यात विविध ठिकाणी चालू आहे, 

  या आधिक घटना सातत्याने वाढ होतच चालली होती, व याचा त्रास मात्र आमचा सर्व साधारण वर्ग चार मधिल लाईनस्टाफ बांधव सहन करत होता, पण यावर अखेर आवाज उठविला तो म्हणजे श्री प्रशांत लबडे पाटील यांनी व यांच्या सहकारी मित्रांनी संपूर्ण महाराष्ट्रातील लाईनस्टाफ बांधवांना एकत्रित करून, अ.नगर येथील शेवगाव येथे राज्यस्तरीय लाईनस्टाफ मेळावा घेऊन अखेर सर्वांच्या आग्रहाखातर क्रांतिकारी लाईनस्टाफ सेनेची घोषणा करण्यात आली व संघटनाही महिनाभरात कामगार आयुक्तालयात नोंदणी करण्यात आली, सदर संघटनेचे रितसर उद्घाटन,करून केंद्रीय कार्यकारनी नुकतीच जाहीर करण्यात आली,संघटनेची कोरकमिटीने राज्यभर संघटनेचा विस्तार करणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस श्री.ललित कारभारी शेवाळे, नाशिक यांनी दिली.

Post a Comment

0 Comments