एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसच्या ५ विद्यार्थ्यांची सैन्य दलामध्ये मध्ये निवड

एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देताना क्लासचे संचालक प्रा चेतन साळवे सर ...(छाया - चंद्रकांत कदम)



पारनेर (चंद्रकांत कदम)
    भारतीय सैन्य दल भरतीचा निकाल नुकताच लागला असून राज्यभरातील अनेकांची सैन्यामध्ये भरती होण्याचे स्वप्न साकार झाले आहे.या भरतीमध्ये पारनेर मधील एव्हरेस्ट कोचिंग क्लासेस व स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचे ५ विद्यार्थी इंडियन आर्मीमध्ये भरती झाले आहेत. स्पर्धा परीक्षेच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्याबद्दल एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. चेतन साळवे यांचे पारनेर तालुक्यातील अनेकांनी अभिनंदन केले.

        सैन्य दल भरतीचा निकाल नुकताच लागला असून इंडियन आर्मी २०२२ मध्ये पारनेर तालुक्यातून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.यामध्ये एव्हरेस्ट कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ५ विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड झाली आहे. यामध्ये सुजित थोरात (पिंपरी जलसेन), मनोज कार्ले (चास), प्रवीण पोटे (पिंपळनेर), तन्मय ठुबे (कान्हूर पठार) व अनिल शेळके (हत्तलखिंडी) या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत सैन्य दलात निवड झाली आहे. एव्हरेस्ट कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राकडून नेहमीच विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षेच्या लेखी परीक्षेची तयारी करून घेतली जाते. २०१८ पासून या क्लासच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. चेतन साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.


विद्यार्थ्यांची देशसेवेमध्ये निवड झाल्याने ऊर्जा मिळते - प्रा चेतन साळवे
      एव्हरेस्ट कोचिंग क्लास व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सुमारे ५० विद्यार्थ्यांची आतापर्यंत आर्मी मध्ये निवड झाली आहे. या खेरीज अनेक विद्यार्थी पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन यामध्ये देखील भरती होत आहेत. आम्ही विद्यार्थ्यांकडून लेखी परीक्षेची तयारी करून घेत असून त्यांच्या निवडीची १००% हमी आम्ही देत आहोत. त्यामुळे आमच्या गुणवत्तेच्या निकालावर विश्वास ठेऊन अनेक विद्यार्थी क्लाससाठी ऍडमिशन घेत आहेत. आमच्या क्लासच्या विद्यार्थ्यांची देशसेवेमध्ये निवड झाल्याने आम्हाला देखील नवीन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी ऊर्जा मिळत असल्याची प्रतिक्रिया एव्हरेस्ट कोचिंग क्लास पारनेरचे संचालक चेतन साळवे यांनी दिली.





 

Post a Comment

0 Comments