गारगुंडी येथील ७५ वर्षीय आजोबांच्या नाकावरील गाठीचे डॉ श्रीकांत पठारे यांनी केले मोफत ऑपरेशन
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील गारगुंडी येथील ७५ वर्षीय अपंग आजोबा त्रिंबक बारीकराव झावरे यांच्या नाकावर गेल्या अनेक दिवसांपासून गाठ होती. परिस्थिती हलाखीची असल्याने उपचारासाठी पैसे नसल्याने त्रास होत असताना देखील ते उपचार घेऊ शकत नव्हते. हे जेव्हा पारनेर तालुक्यातील पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांना समजले तेव्हा त्यांनी तातडीने रुग्णवाहिका पाठवून अपंग आजोबांना हॉस्पिटल मध्ये दाखल करून त्यांच्या नाकाची शस्त्रक्रिया यशस्वी केली. विशेष म्हणजे डॉ पठारे यांनी हॉस्पिटल, रक्त तपासणी, मेडिकल व शस्त्रक्रियेची कुठलीही फी न घेता अगदी मोफत उपचार केले. यावेळी अनेक वर्षांपासून आजोबांच्या नाकावर असलेली गाठ काढल्याने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान पाहायला मिळत होते.तेव्हा न कळत आजोबांच्या तोंडून "मी आज माणसातला देव पहिला" असे गौरवोद्गार डॉ श्रीकांत पठारे यांच्या बाबतीत निघाले.
डॉ श्रीकांत पठारे यांचे सामाजिक काम तालुक्यात ज्ञात आहे. तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी नुकतीच एक रुग्णवाहिका जनतेसाठी अर्पण केली आहे. त्यांच्या या सामाजिक कामाबद्दल राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे.त्यातच पुन्हा डॉ पठारे यांनी गारगुंडी येथील ७५ वर्षीय अपंग आजोबांच्या नाकावरील गाठीची मोफत शस्त्रक्रिया करून दिली आहे. याबद्दल देखील तालुकभरातून त्यांचे आभार मानले जात आहेत. त्यांच्या या सामाजिक कामात त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा पठारे, बंधू प्रमोद पठारे, प्रशांत निंबाळकर व त्यांच्या स्टाफ चे मोलाचे सहकार्य लाभत आहे.



0 Comments