समाजपयोगी उपक्रमांनी डॉ पठारे यांचा वाढदिवस तालुकाभर साजरा


पारनेर प्रतिनिधी
      पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने तालुकाभर विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पारनेर तालुक्यातील जनतेला अत्यल्प दरात व जवळा गणातील जनतेसाठी मोफत देण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

        डॉ श्रीकांत पठारे हे गेल्या २० वर्षांपासून समाजसेवेत आहेत. त्यांची जनतेशी घट्ट नाळ जुळली आहे. १९ डिसेंबर रोजी त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तालुक्याभरातील जनतेने या "लोकनेत्याचा" वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. पारनेर तालुक्यातील जनतेला खाऱ्याअर्थाने गरजेची असलेली रुग्णवाहिका डॉ पठारे यांनी पारनेर तालुक्याल जनतेला अत्यल्प दरात व ते प्रतिनिधित्व करत असलेल्या पारनेर पंचायत समितीच्या जवळा गणातील जनतेसाठी ही रुग्णवाहिका मोफत देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्या रुग्णाविकेचे लोकार्पण पानोली, पिंपळनेर, वडुले, सांगवी सूर्या, पिंपरी जलसेन, गांजिभोयरे, जवळा, देवीभोयरे, पठारवाडी यांसह तालुक्यातील अनेक गावांत नागरिकांनी करून डॉ पठारे यांचा वाढदिवस साजरा केला. डॉ पठारे हे नेहमीच अनेक समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी अनोखे काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. पारनेर तालुक्यातील जनतेने देखील डॉ पठारेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला.

        रूग्णवाहिकेच्या माध्यमातून समाजातील अत्यंत गरीब  घटकापर्यंत  उपचार पोहचवणार असून समाजातील रंजल्या गांजल्यांची सेवा करणार आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा असून समाजातील जनतेची सेवा करणार असल्याचे मत यावेळी डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.

लेख लिहून अनेकांनी केल्या डॉक्टरांविषयी भावना व्यक्त
अहमदनगर शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर, अण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुलपाटील शिंदे, शिवसैनिक राहुल तामखडे, डी. के.पांढरे पाटील, शिवसेना शाखाप्रमुख अमोल गजरे, पत्रकार चंद्रकांत कदम यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर लेख लिहून डॉ श्रीकांत पठारे यांच्याविषयी असणाऱ्या भावना व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments