डॉ पठारे यांचे सामाजिक काम वेगळ्या उंचीवर - ना. विजयराव औटी

 पारनेर प्रतिनिधी

पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांचे सामाजिक काम अनोखे असून वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे समाजीक काम एका वेगळ्या उंचीवर पोहोचले असल्याचे मत विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांनी व्यक्त केले.

     डॉ श्रीकांत पठारे यांचा वाढदिवस  ना. विजयराव औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील प्रमुख नेत्यांनी पारनेर येथे साजरा केला. यावेळी शुभेच्छा देताना ना. औटी म्हणाले की, डॉ पठारे हे वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त अनेक समाजपयोगी काम करत आहेत. तालुक्यात त्यांची अनेक सामाजिक कामे दिसत आहेत. एक सुशिक्षित चेहरा समाजातील तळागाळातील जनतेला मदत करत असून डॉ पठारे यांचे भविष्य उज्वल आहे. त्यांच्या सामाजिक कामाचे अनुकरण सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे ना. औटी म्हणाले.
  यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य सुजित झावरे, आझाद ठुबे, काशीनाथ दाते सर, बाबासाहेब तांबे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, अण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुल पाटील शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments