डॉ श्रीकांत पठारे एक असामान्य व्यक्तिमत्व - अमोल गजरे

 डॉ श्रीकांत पठारे वाढदिवस विशेष लेख


गेली कित्येक वर्षे समाजातील तळागाळातील लोकांची काम करण्याची संधी शिवसेना पक्षाने मला दिली, देविभोयरे गावामध्ये शिवसेना शाखाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी एका अल्पसंख्याक समाजातील तरुणाला भेटावी हे माझं भाग्यच.नेहमीच काही तरी काम घेऊन पारनेर ला जावंच लागायचं, आमदार विजयराव औटी साहेबांच्या नेतृत्वात काम करायचा आनंद वेगळाच.. पण आपल्याला समजून घेणार एक हक्काचं नेतृत्व मिळावं अशी मनोमन ईच्छा होती, आणि मागील पंचायत समिती इलेक्शन मध्ये सुदैवाने ती पूर्ण देखील झाली. ती हक्काची व्यक्ती म्हणजे जवळा पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवणारे पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांतजी पठारे साहेब.


आज डॉक्टर साहेबांचा जन्मदिवस त्याबद्दल साहेबांना तमाम देविभोयरे ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा.

साहेबांबद्दल काय बोलावं  या पेक्षा नक्की काय काय बोलावे हाच विचार पडतो, सदैव हसतमुख तेजस्वी चेहरा, रसाळ वाणी, मार्मिक विवेचन, एखाद्याच मन जाणून घेण्याची क्षमता,  कुणाच्याही सुख दुःखात सहभागी होण, कार्यकर्त्यांना बळ देणं, अडलेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करणं, आणि एकनिष्ठेने पक्षासाठी काम करणं, बोलावं तेव्हडे कमी अस हे उमद नेतृत्व.आम्हाला लाभलं हे आमचं भाग्यच ..

इलेक्शन च्या वेळेस त्यांच्या सोबत केलेला प्रचार तर कधीही विसरू शकणार नाही, मला ते कायम अमोल शेठ या नावाने बोलावतात, एकदम सहजतेने अमोल शेठ मला यातला अनुभव नाही तुम्ही तुमच्या मनानी ठरवा काय करायचं हे त्यांचं बोलणं मुळातच त्यांच कौशल्य दाखवून देत, साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्ती प्रमाणे खरचं  अतिशय उच्च विचारांचं हे नेतृत्व जवळा गणामध्ये खूप चांगलं कार्य करत आहे,

एखाद्या परिवारावर दुःखद क्षण आला की सर्वतोपरी मदत करण्याचा काम तालुक्यात डॉ श्रीकांतजी पठारे यांनी केलं आहे, अनेक गोर गरिबांना वैद्यकीय सुविधा पुरवण्याच महान कार्य डॉक्टर साहेबांनी केलंय, पंचायत समिती मार्फत कित्येक योजना प्रभावी पने ते आजही राबवत आहेत, 

मागे एकदा माझ्यावर प्रसंग ओढवला तेव्हा स्वतः मला भेटून मी आहे ना काळजी करू नका अस बोलून त्या मधून मला बाहेर देखील काढल, खर तर ही व्यक्ती नाही तर एक दैवी शक्तीच आहे माणसातला देव माणूस म्हणाल तरीही योग्यच ठरेल अश्या नेतृत्वाचा आज जन्मदिन आहे आई अंबिका आपणास उदंड आयुष्य देवो, व आपल्या हातून अशीच जनसेवा घडत राहो हीच जगदंबे चरणी प्रार्थना, व जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा,



श्री अमोल ज्ञानदेव गजरे

शिवसेना शाखा प्रमुख देविभोयरे




Post a Comment

0 Comments