🚩🌹🚩🌹🚩🌹🚩🌹
🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
एक मनोगत एका सर्वसामान्य नेत्रृत्वाविषयी, माझ्यासाठी अनेक नाती असनारे डॉ श्रीकांत पठारे ( आण्णा) माझे ज्येष्ठ बंधुच, जसं नातं सुदाम्याच आणि भगवान श्रीकृष्णाच, जसं नातं अर्जुनाच आणि भगवान श्रीकृष्णाच, जसं नातं एक जिवलग मित्रांच अशी अनेक प्रकारच ,खरच भाग्यवान आहे मी. असं एका सर्वगुणसंपन्न माणसाचं सानिध्य मला लाभलं आणि मलाच नाही तर ह्या तालुक्यातील जनतेला सुद्धा ह्या माणसाच्या स्वभावाने, आपुलकीने, कर्तुत्वाने, आणि आपल्या मनमिळाऊ स्वभावाने मोहिनी घातली आहे. आणि यामागच मुख्य कारण म्हणजे ह्या माणसाने सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आपली नाळ,
खरच आज ह्या माणसाविषयी समाजात एक आगळीवेगळी सद्भावना ऐकावयास मिळते. सर्वसामान्य समाजाचा नेता म्हणून.डॉ. श्रिकांतजी पठारे (आण्णा) पारनेर तालुक्यातील जवळा गणाचे पंचायत समिती सदस्य, कुठलाही राजकीय वारसा नसतानाही, केवळ आपला सोज्वळ स्वभावाने, आणि आपल्या चाहत्यांच्या, शुभेच्छांच्या पाठबळावर, पहिल राजकीय पाऊल तालुकापातळीवर टाकलं. आणि एक इतिहास घडविला, अनेक आव्हाने पेलीत, खुप मोठी बलाढ्य ताकद पुढे असताना सुद्धा अगदी सहजपणे, सर्व आव्हाने पेलीत, अगदी सहजपणे ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली.
खुप मोठा सामना, खुप आव्हाने आजही ह्या माणसापुढे उभी आहेत , परंतु कुठल्याही प्रकारे न डगमगता आजही हा माणुस सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज आहे .
कारण आहे ते सर्वसामान्य जनतेविषयीच असणार प्रेम, कळवळा, विश्वास, आणि तगमग.
कुठल्याही परिस्थितीला न डगमगता आजही हा माणुस सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी कुठल्यानाकुठल्याप्रकारे मदतीचा हात देत आहे.जनतेच्या सर्वप्रकारच्या सुखदुःखामधे हा माणुस सतत उभा आहे. जे जे काही आपल्या हातुन जनतेची सेवा होता होईल, ते ते प्रयत्न सतत करताना आपण सर्व पहात आहोत. नुकतीच परवा एक उत्कृष्ट अशा प्रकारची अँबुलन्स आपल्या गणातील रुग्नांसाठी आण्णांनी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या डॉक्टरीपेशातुनही खुप अस मोलाचं सहकार्य होता होईल तेव्हढा ते करत असतात.
असो ह्या माणसाविषयीच्या महान कर्तुत्वाविषयी बोलण्यासारख खुप आहे. खरं तर शब्द अपुरे पडतात.
अशा ह्या महान नेत्याचा 19 डीसेंबर हा जन्मदिवस आणि त्या निमित्ताने माझ्या ह्या नेत्याला शाब्दिक मनोगतातुन कोटी कोटी शुभेच्छा. माझ्या मनातील ह्या नेत्याविषयी भाविकाळातील खुप काही मोठी स्वप्न, ईच्छा आकांक्षा, ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आई जगदंबे चरणी, देवाधीदेव महादेवांच्या चरणी व्यक्त करीत आहे .आणि मला निश्चित खात्रि आहे माझी आणि ह्या माणसावर प्रेम करणार्या तमाम जनतेची, सर्व स्वप्ने निश्चितच येणाऱ्या पुढील काळात पुर्ण होणार आहेत.
पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने ह्या नेत्याला मनापासून कोटी कोटी शुभेच्छा.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राहुल तामखडे (युवानेते) व डी के पाटील पांढरे मित्र परिवार गांजिभोयरे



0 Comments