वाढदिवस विशेष लेख
![]() |
| डॉ श्रीकांत पठारे (सदस्य पंचायत समिती पारनेर) |
डॉक्टरांना देव मानले जाते. याचे कारण म्हणजे ते लोकांना नवीन जीवन देतात. रुग्णांचे आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करून देतात. गेल्या 9 महिन्यांपासून कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. आणि जगभरातील अनेक जण त्या कोरोनाचा बळी गेले आहेत. सर्वच जण स्वतःचा जीव वाचविण्यासाठी घरातच थांबून होते. काही ठिकाणी डॉक्टरांनी देखील स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हॉस्पिटल बंद ठेवले त्यावेळी उपचाराभावी रुग्णांची होणारी हेळसांड थांबवत पारनेर पासून सुमारे 30 ते 40 किलोमीटर पर्यंत स्वखर्चाने जाऊन डॉ श्रीकांत पठारे यांनी रुग्णांना मोफत उपचार करून जीवदान दिले आहे. त्यावेळी पारनेरकरांना खऱ्या अर्थाने डॉ श्रीकांत पठारेंच्या रूपाने सामान्य माणसातला असामान्य देवमाणसाचे देवदर्शन घडले.
![]() |
| वडनेर येथील आजींना कोरोना काळात घरी जाऊन मोफत उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे. |
"रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा" हे व्रत हाती घेऊन समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांपैकी डॉ श्रीकांत पठारे हे एक. घेतलेल्या व्रताला तंतोतंत जागून समाजाप्रती डॉक्टरांविषयी एक आपुलकीची भावना व विश्वासाचे नाते डॉ पठारेंनी घट्ट केले आहे. गेल्या 25 वर्षांपासून डॉ श्रीकांत पठारे व त्यांची सुविद्य पत्नी डॉ पद्मजा पठारे ओंकार हॉस्पिटल पारनेर च्या माध्यमातून समाजातील गोरगरीब व रंजल्या-गांजल्यांची सेवा करत आहेत. हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाकडून फक्त मेडिकल चा खर्च घेऊन बाकी सगळे उपचार मोफत व अत्यल्प दरात करून देत असल्याने तालुक्यातून अनेक रुग्ण डॉ पठारे यांच्याकडे उपचार घेत आहेत.

कोरोना काळात गोरगरिबांना मोफत किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून गोरगरिबांच्या चुली डॉ श्रीकांत पठारे यांनी पेटविला.
आयुष्यामध्ये खूप संघर्ष करून जीवनातील चढउतारांना सामोरे जात डॉ श्रीकांत पठारे हे आज समाजात वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत. पारनेर तालुक्यातील वडुले ह्या छोट्याश्या गावचे रहिवासी असणाऱ्या डॉ पठारे यांनी सामाजिक कामाबरोबर वडुले ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केले. दरम्यानच्या काळात अनेक कुटुंबांना व त्यांच्या गरीब मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे शिक्षण पूर्ण केले. व त्यांना रोजी-रोटीला लावले. वैद्यकीय सेवा करत असताना समाजसोबत एवढी घट्ट नाळ तयार झाल्यानंतर लोकांच्या आग्रहाखातर डॉ पठारे यांनी 2017 मध्ये जवळा गणातून पंचायत समिती निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्क्याने निवडून देखील आले. हॉस्पिटल मध्ये उपचाराच्या निमित्ताने अथवा इतरही समस्या घेऊन येणाऱ्या तरुणांसोबत धाकट्या भावाप्रमाणे व वडीलधाऱ्यांसोबत आईवडिलांसारखा मान देऊन सर्वांच्या मनावर हक्काचा माणूस म्हणून अधिराज्य डॉ पठारे यांनी केले. सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन दुःख हलकं करून त्या कुटुंबाचे सांत्वन करून सर्वोत्तपरी मदत करण्याचे देखील काम करत आहेत. एखाद्या घरातील कर्ता पुरुषाचे अकाली निधन झाले तर त्या संपूर्ण कुटुंबाची वैद्यकीय सेवा मोफत देऊन कुटुंबातील मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचे अनोखे सामाजिक काम डॉ पठारे अनेक वर्षांपासून अविरतपणे करत आहेत. कोरोना काळात लोकांचे रोजगार गेले अनेक कुटुंब घरीच असल्याने उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी तालुक्यात सर्वप्रथम डॉ श्रीकांत पठारे यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील दोन ते अडीच हजार कुटुंबांना मोफत जीवनावश्यक किराणा वाटप केला. रुग्णसेवेसोबत गोरगरीबांची चूल पेटवणारा पृथ्वीवरील देवदूत प्रथमच पारनेरकरांना पहावयास मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नी महावितरण अधिकाऱ्यांना फैलावर घेत शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविणारे डॉ श्रीकांत पठारे
१९ डिसेंबर हा डॉ पठारे यांचा जन्मदिवस. आणि आपला जन्मदिवस हा समाजातील गोरगरिबांसोबत साजरा व्हावा ही पहिल्यापासून डॉक्टरांची इच्छा. प्रत्येक वाढदिवसानिमित्त डॉ पठारे हे समाजातील गोरगरीब कुटुंब दत्तक घेणे, गोरगरीबांना रोजगार देणे, समाजपयोगी वस्तू देणे, मंदिरांना फरशी व इतर साहित्य देऊन साजरा करत आहेत. या वर्षी समाजासाठी वेगळा आदर्श निर्माण करत पारनेर करांसाठी एक अद्ययावत रुग्णवाहिका अत्यल्प दारात उपलब्ध केली आहे. याखेरीज जवळा पंचायत समिती गणातील नागरिकांसाठी अगदी मोफत ही रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे. समाजाप्रती एवढा आदर व आपुलकी असणाऱ्या या देवदूताच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून समाजाची सेवा अविरत पणे घडत राहो व त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
| चंद्रकांत कदम (पत्रकार) |


0 Comments