समाजासाठी धडपडणारा सर्वगुणसंपन्न समाजसेवक डॉ श्रीकांत पठारे - राहुल पाटील शिंदे

 वाढदिवस विशेष लेख

डॉ श्रीकांत पठारे (पंचायत समिती सदस्य)


सर्वगुणसंपन्न,बुद्धिवान, उच्चशिक्षीत, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजासाठी अहोरात्र झटणारे, कोरोना काळात रुग्णांना मोफत उपचार करून तालुक्यात प्रथम कोरोना उपचार केंद्रावर रुग्णांना मोफत उपचार करून रुग्णांना धीर देणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून डॉ श्रीकांत पठारे यांची ओळख आहे.


      पंचायत समिती सदस्य म्हणून काम करत  पेशाने डॉक्टर असणारे श्रीकांत पठारे यांचे सामाजिक काम संपूर्ण तालुक्याला ज्ञात आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या सुसंस्कृत विचारसरणीवर प्रेरित होऊन वैचारिक  त्यांचा नावाला साजेसे असे सामाजिक काम डॉ श्रीकांत पठारे हे समाजात करत आहेत. नुकतेच त्यांनी पारनेर तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यल्प दरात रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्याचे पूजन देखील माझ्या हस्ते केले तेव्हा मला डॉ पठारे यांचा अभिमान व कौतुक वाटले. प्रत्येक क्षणोक्षणी समाजाचा विचार करणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ पठारे यांची ओळख आहे. नेहमीच एक बंधुत्वाचे नाते निभावून आपल्या अनोख्या शैलीने सर्वांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या बंधुतुल्य मित्राचा आज वाढदिवस.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शिवनेरीची श्रीमंती 

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

मा.राहुलपाटील शिंदे (अध्यक्ष अण्णा हजारे युवा मंच)

Post a Comment

0 Comments