खुल जा सिम सिम.... २३ मतदारांचे भवितव्य मतपेटीत बंद....!

पिंपरी जलसेन ग्रामपंचायत निवडणुकीत ८५% मतदान



पारनेर प्रतिनिधी

पिंपरी जलसेन ग्रामपंचायत निवडणूक आज पार पडली. 9 जागेसाठी पार पडलेल्या मतदानासाठी 23 उमेदवार रिंगणात उभे होते. निवडणुकीत 85 टक्के मतदान पार पडले असून 23 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून 18 तारखेला निकालातून उमेदवारांचे भविष्य उलगडणार आहे.

आज 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. 1759 पैकी 1496 म्हणजे 85 टक्के मतदान पार पडले. काही अंशी मतदानात घट झाली असून प्रभाग एक मध्ये सर्वात कमी मतदान झाले. दिवसभर अतिशय शांततेत मतदान पार पडले. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य केले. 

वार्डनिहाय मतदान खालील प्रमाणे....

ग्रामपंचायत निवडणूक अपडेट

एकूण मतदान 1759 पैकी झालेले मतदान 1496

वार्ड -१ 588 पैकी झालेले मतदान 468 80%

वार्ड २- 592 पैकी झालेले मतदान 515 87.00%

वार्ड 3   579 पैकी झालेले मतदान 513 88.00%

Post a Comment

0 Comments