पारनेर - प्रतिनिधी
१९ सप्टेंबर २०२२ रोजी पारनेर तालुक्याचे माजी आमदार व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार झावरे पाटील यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा मा.आमदार नंदकुमार झावरे विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून न्यू आर्ट्स महाविद्यालय पारनेर येथे संपन्न झाला.यानिमित्ताने मा.आमदार झावरे पाटील यांनी सत्कार समारंभासाठी हार-तुरे न आणता विविध प्रकारची दर्जेदार पुस्तके त्यामध्ये स्पर्धा परीक्षा उपयोगी व सामान्य ज्ञान अशा प्रकारची पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन केले.साहेब हे स्वतः वाचन प्रिय व तालुक्यातील एक सुसंस्कृत नेतृत्व हे सर्वश्रुत आहे.साहेबांचे वक्तृत्वही अमोघ आहे. यातून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे हा उद्देश तसेच आजच्या काळामध्ये वाचन ही काळाची गरज ओळखून साहेबांनी अशा प्रकारचे आवाहन केले आणि त्यांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी हजारो पुस्तके वाढदिवसानिमित्ताने साहेबांना भेट म्हणून दिली. ती सर्व पुस्तके जिल्हा मराठा संस्थेतील विविध शाळा-महाविद्यालयास भेट देण्यात आली.त्यानिमित्ताने आज न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या विद्यालयास मा.नंदकुमार झावरे पाटील विकास प्रतिष्ठान च्या वतीने न्यू आर्ट्स चे प्राध्यापक संजय कोल्हे यांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले यांना ही पुस्तके सुपूर्द करण्यात आली.
या निमित्ताने प्रतिष्ठानचे नामदेव ठाणगे,गंगाराम खोडदे,गणेश झावरे विद्यालयाचे उपप्राचार्य कुसकर ,पर्यवेक्षक अंकुश अवघडे,श्रीम. मनिषा जगदाळे,श्रीम निर्मला साेबले,श्रीम. मनिषा गाडगे, श्रीम. शर्मिला मगर,श्रीम. मंगल पठारे,श्रीम. वैशाली सालके, श्रीम. सुजाता गुंड,श्रीम. कल्पना नरसाळे,श्रीम.वंदनाढगे,श्रीम. रिमा भिंगारदिवे, श्रीम .स्वाती म्हस्के श्रीम.लताबाई वाल्हेकर,श्रीम.किर्ती कुसकर,श्रीम.सुरेखा थोरात,मनोहर रोकडे,जयवंत पुजारी,बापू होळकर ,ज्ञानेश्वर कवडे,श्रीकांत शिंदे,निलेश पाचारणे,सुशांत पंदरकर सर ,दिनेश आंबेकर ,संतोष पारधी,इ.शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments