पिंपरी जलसेनच्या शेतकऱ्यांचा पाणी फाउंडेशनच्या "या" स्पर्धेत महाराष्ट्रात पहिला नंबर.....

 


विषमुक्त भेंडी पिकवल्याबद्दल पिंपरी जलसेन येथील शेतकऱ्यांचा सन्मान

श्री रोकडोबा गटशेती ग्रुपकडून सेंद्रिय भेंडीपीक महाराष्ट्रात १ नंबर...

पारनेर प्रतिनिधी

सध्या सर्वत्र रासायनिक खतांचा सर्रास वापर होत असून रासायनिक युक्त भाजीपाला नेहमीच खाण्यासाठी येत असल्याने अनेक रोगांना घरबसल्या आमंत्रण येत आहे. या सर्वांवर आळा घालण्यासाठी सेंद्रिय पिके घेण्यासाठी पाणी फाउंडेशन अंतर्गत मार्फर कप ही स्पर्धा घेतली जात आहे. पारनेर तालुक्यातील पाणी फाउंडेशनच्या मध्यानातून राज्यभरात नावलौकिक असलेल्या पिंपरी जलसेन येथील श्री रोकडोबा गटशेती ग्रुप ने सेंद्रिय पद्धतीने गटशेती करत भेंडीपीक घेतले आहे. या भेंडीपीकाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवला असता हे भेंडीपीक पूर्णपणे सेंद्रीय असून विषमुक्त असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रात एकमेव "या" गटाची भेंडी विषमुक्त असल्याचा अहवाल TUV nord group या प्रयोगशाळेने दिला आहे. याबद्दल या गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान पिंप्री जलसेन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

        पाणी फाउंडेशन अंतर्गत यापूर्वी वॉटर कप, समृद्ध गाव या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता फार्मर कप ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतर्गत शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करावयाची होती.या "फार्मर कप" या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ३९ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पारनेर तालुक्यातील ४८ शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता. राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले ३६ प्रकारचे शेतीमाल या स्पर्धेसाठी ठेवला होता. यापैकी पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील श्री रोकडोबा शेतकरी गटाने पिकवलेली सेंद्रिय भेंडी मध्ये रासायनिक खतांचा अंश नसून ती पूर्णतः विषमुक्त असल्याचा अहवाल TUV NORD GROUP  या प्रयोगशाळेने दिला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विषमुक्त भेंडीपीकामध्ये राज्यात एकमेव पिंपरी जलसेन येथील शेतकऱ्यांची भेंडी विषमुक्त असल्याचा अहवाल मिळला आहे. पिंपरी जलसेन येथील २१ शेतकऱ्यांनी २५ एकर क्षेत्रावर भेंडीपीक घेतले होते. या शेतकऱ्यांनी जीवामृत व दशपर्णी अर्क तसेच अनेक सेंद्रिय खतांपासून हे भेंडीपीक घेतले आहे. शेतकऱ्यांना कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणे हाच एकमेव उद्देश ठेऊन पाणीफौंडेशन ही संस्था काम करत आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ अविनाश पोळ, प्रशासकीय अधिकारी नामदेव ननावरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

     भेंडीपीकामध्ये राज्यभरात एकमेव पिंपरी जलसेन येथील शेतकरी गटाचा भेंडी पिकाचा विषमुक्त अहवाल आल्याबद्दल त्यांचा पिंपरी जलसेन येथे  सन्मान करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक लहु थोरात , प्रसिद्ध गाडा मालक दत्तात्रय भाऊसाहेब निघुट, ग्रामपंचायत सदस्य अभिमन्यू प्रभू थोरात, सरपंच सुरेश नानाभाऊ काळे सरपंच,ग्रामरोजगार संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव सखाराम थोरात ,दत्तकृपा पतसंस्थेचे माजी चेअरमन दत्तात्रय मुक्ताजी थोरात,सेवा सोसायटीचे संचालक विठ्ठल यादव आडसरे, प्रगतशील शेतकरी हिरामण भानुदास थोरात, सेवा संस्थेचे माजी चेअरमन रामदास काशिनाथ शेळके, फक्कड भाऊ शेळके, नारायण थोरात, दिनेश थोरात, दत्तात्रय वाढवणे, विकास वाढवणे, साहेबराव शेळके, संतोष काळे, संतोष शेळके, दत्तात्रय थोरात, जगन्नाथ काळे, विश्वास काळे, तुषार काळे, सागर बोरुडे, किरण वाढवणे, निवृत्ती थोरात, लक्ष्मण बोरूडे, संदीप शेळके, गोरख शेळके, भाऊसाहेब सदाशिव थोरात, रामदास सिताराम थोरात, जयवंत दादाभाऊ शेळके, संभाजी आडसरे, शिवाजी किसन थोरात, बाळू अडसरे, सकाराम पवार, गौरम पवार, पांडुरंग भाऊ थोरात, दौलत थोरात, शुभम थोरात, तेजस वाढवणे, संजय दशरथ थोरात आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.



अण्णा हजारेंकडून कौतुक....

विषमुक्त भेंडी पिकवल्याबद्दल व महाराष्ट्रात एकमवे निवड झाल्याबद्दल पिंपरी जलसेन येथील रोकडोबा शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांचा जेष्ठ समासेवक पदमभूषण अण्णासाहेब हजारे यांनी कौतुक करून शाबासकी दिली.यावेळी शेतकऱ्यांनी विषमुक्त भेंडी अण्णांना खाण्यासाठी दिली.


पाणी फौंडेशनमध्ये पिंपरी जलसेनचे नाव पहिल्या क्रमांकावर.....

पाणी फाउंडेशनच्या "वॉटर कप" स्पर्धेत जलसंधारणाच्या कामात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने पिंपरी जलसेन गाव विजयी झाले होते. त्यानंतर आता  "फार्मर कप" स्पर्धेत विषमुक्त भेंडी पिकात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने पिंपरी जलसेन गाव आहे. त्यामुळे पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत पिंपरी जलसेन नेहमीच पहिल्या क्रमांकावर असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments