रोख ठोक न्यूज पारनेर
शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांच्या सामाजिक व वैद्यकीय कामांमुळे त्यांची पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात क्रेज आहे. अबालवृद्धांसह तरुणांचे विशेष आकर्षण व आयडॉल म्हणून डॉ श्रीकांत पठारे यांची सर्वत्र ओळख आहे. आता लहान मुले देखील यात मागे राहिली नसून "अण्णा आम्हाला तुमच्यासोबत सेल्फी घेउद्या" अशी मागणी चिमुकल्यांनी केल्याने डॉ श्रीकांत पठारे यांनी त्या चिमुकल्या मुलांना मायेने जवळ घेत त्यांची इच्छा पूर्ण केली. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व उत्साह पाहायला मिळाला.
सध्या महाराष्ट्रात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार मधील भागवत मळ्यात वरुंडी माता नवरात्र उत्सव साजरा होत आहे. या नवरात्र उत्सवात देवीच्या आरतीचा मान शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांना देण्यात आला होता. आरतीवेळी डॉ पठारे यांचे आगमन झाल्यानंतर तरुण वर्गासह नागरिक त्यांचे स्वागताला सामोरे गेले. यावेळी तेथील उपस्थित लहान मुलांना डॉ श्रीकांत पठारे यांच्याशी बोलण्याचा व त्यांसोबत फोटो काढण्याचा मोह झाला. ही लहानगी मुले लडिवाळ प्रमाणे डॉ पठारे यांच्याजवळ जाऊन घरातल्या सदस्या प्रमाणे त्यांच्यासोबत रमली. अण्णा कोरोनाकाळात तुम्ही आमच्या घरातील माणसांना खूप चांगले उपचार केले. खूप काळजी घेतली असे म्हणल्यावर डॉ पठारेंनी देखील त्यांना आपुलकीने जवळ घेऊन मायेने त्यांची विचारपूस केली. त्यातच लहान मुलांनी "अण्णा आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. आम्हाला सेल्फी घेउद्या" असे म्हणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यासोबत फोटो घेऊन त्यांची हौस पूर्ण केली. शाळेत चांगले शिक्षण घेऊन खूप मोठे व्हा असा सल्ला व शुभेच्छा डॉ पठारे यांनी मुलांना दिल्या. यावेळी कान्हूर पठार भागवत माळ्यातील सर्व नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments