२०२४ च्या निवडणुकीत औटी साहेब आमदार होणार ही सर्वसामान्य जनतेची इच्छा - डॉ श्रीकांत पठारे

पारनेर तालुक्यातील गुणोरे व कोहोकडी येथे शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन


पारनेर (चंद्रकांत कदम)


२०१९ च्या निवडणुकीपेक्षा आताची तालुक्यातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. २०१९ मध्ये शिवसेनेला तालुक्यात आलेले अपयशाचा बदला घेण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य जोमाने कामाला लागली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयराव औटी साहेबच पारनेरचे आमदार असतील अशी इच्छा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची असल्याचे मत शिवसेना तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.



विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या संकल्पनेतून शिवसेना वाढवा, महाराष्ट्र वाचवा हे अभियान सुरू केले असून या अभियानांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेच्या शाखा सुरू करण्याचे काम सुरू आहे. नुकतेच पारनेर तालुक्यातील गुणोरे व कोहोकडी येथे शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख डॉ श्रीकांत पठारे बोलत होते. यावेळी बोलताना डॉ पठारे म्हणाले की, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कामे केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेनेच्या पारनेर तालुकाप्रमुख पदी निवड केली. निवडीनंतर तालुकभर फिरून संघटना वाढीसाठी काम करत असताना व जनतेच्या भेटी घेत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. सर्वसामान्य जनतेच्या मनात आजही विजयराव औटी साहेबच पुन्हा आमदार व्हावे अशी इच्छा असून येत्या २०२४ मध्ये विजयराव औटी साहेबांना तालुक्याचे प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी तालुक्यातील शिवसैनिक आतापासून कामाला लागले आहेत. ना. औटी साहेबांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महाराष्ट्र वाचवा, शिवसेना वाढवा या उपक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा उभारणार असून जुन्या शाखांची नव्याने बांधणी करून शिवसैनिकांना बळ देण्याचे काम करणार असल्याचेही यावेळी डॉ पठारे बोलले.




यावेळी मा . पंचायत समिती सदस्य डॉ भास्करराव शिरोळे नगरसेवक युवराज पठारे, नगरसेवक ऋषिकेष गंधाडे, नगरसेवक कांतिलाल ठानगे, नगरसेवक देवराम ठुबे, नगरसेवक राजु शेख, शहरप्रमुख निलेश खोडदे, उपतालुकाप्रमुख किसनराव सुपेकर, सोसायटी संचालक किरण सुपेकर, कोहोकडीचे सरपंच साहेबराव पाणगे, महिला आघाडी उपतालुका प्रमुख मनिषा सोमवंशी युवासेना उपतालुखा प्रमुख तेजस सालके, युवा नेते मंगेश बोदगे, योगेश बोदगे, विशाल घोलप, शुभम पठारे, आदींसह किसन चौधरी, संजय झरेकर, शाहाजी नवले, मच्छिद्र चौधरी बापु टोणगे, महेश चौधरी, शेखर ढवण, तेजेस चौधरी, दशरथ टोणगे , संतोष चौधरी, साहेबराव पानगे, विठ्ल चौधरी, मधुकर टोणगे,राहुल टोणगे, संभाजी टोणगे, बाळु पवार, गोरख टोणगे,सतिष गोगडे

,सचिन ,पोपटचौधरी हेमंत खणसे, नितिन टोणगे , सचिन गाडेकर , अथर्व चौधरी, सुरेश टोणगे, किसन पवार,दौलत खणसे,प्रभु खंडेकर,डॉ स्वाती पाणगे,भाणुदास पडवळ,बाळू गोगडे,कैलास कोळपे,जालिंदर झरेकर,वाल्मिक टोणगे,सर्जेराव चौधरी,किशोर साबळे,हरिचंद्र निरवणे,दादाभाऊ टोणगे,लहाणु टोणगे,केतन टोणगे,मधुकर टोणगे,अनिल ढवण,प्रभु खंडेकर,सुनिल उघडे,शरद टोणगे,नवनाथ खंडेकर,सुरेश गोगडे,विठ्ठल चौधरी,रामदास चौधरी,नितिन गोगडे,विट्ठल गोगडे,मच्छिंद्र गोगडे,योगेश कोळपे, विजय मेसे,दत्ता गोपाळे, दत्ता बढे, युवराज बढे, संतोष गोपाळे, महेंद्र बढे, श्रावण गोपाळे, संकेत बढे, दौलत गोपाळे,तुषार बढे,अविनाश कारखीले,पांडुरंग बढे,मयुर बढे,तात्याभाऊ गोपाळे,सिताराम बढे,प्रविण ढवळे,मोहन बढे,रविंद्र दाभाडे,साहेबराव ढवळे,राधुजी साळवे,विकास गागरे,अविनाश गोपाळे,रतन कारखीले,भाऊसाहेब बढे,तात्याभाऊ राऊत,बन्सी बढे,धनाजी सागर,समाधान जाधव,आश्रम गोपाळे,दिलीप मेसे,राहुल सागर,खंडु हिंगे,अक्षय सागर,रामदास गोपाळे,अतुल खोसे,अतुल गोपाळे,सुमीत गोपाळे,केशव बढे,विकास साळवे,शुभम बढे,स्वयम बढे,अनिकेत बढे,चेतन बढे,तुषार साळवे, वैभव बढे आदी उपस्थित होते.






विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी साहेबांच्या नेतृत्वात पारनेर तालुक्यातील शिवसेना काम करत आहे. तालुक्यातील सत्ता नसताना देखील कोटयावधी रुपयांची विकासकामे आज तालुक्यात सुरू आहे. औटी साहेबांकडे विकासाची दूरदृष्टी आहे. तालुक्यात सध्या शिवसेनेची कामे जोरदार सुरू असून आता पारनेर तालुक्यात शिवसेनेला कोणीच थांबवू शकणार नसल्याचे मत माजी पंचायत समिती सदस्य डॉ भास्कर शिरोळे यांनी व्यक्त केले.

डॉ श्रीकांत पठारे शिवसेना तालुकाप्रमुख झाल्यापासून त्यांनी तालुक्यात घोडदौड केली असून शिवसेना वाढीचे काम जोरदार सुरू आहे. डॉ पठारे यांच्यासोबत तालुक्यातील युवकांचे मोठे संघटन असून याचा फायदा शिवसेनेला पुढील काळात निवडणुकीनमधून दिसून येणार आहे.
युवराज पठारे - नगरसेवक पारनेर नगरपरिषद

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीची परिस्थिती पेक्षा यावेळची परिस्थिती तालुक्यातील शिवसेनेसाठी आणखी पोषक आहे. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती पारनेर मध्ये भगवा फडकणार असून येत्या २०२४ च्या विधानसभेत पारनेरमधून शिवसेनेचे आमदार म्हणून विजयराव औटी साहेब प्रतिनिधीत्व करतील असा विश्वास शिवसेना शहरप्रमुख निलेश खोडदे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments