शिवबा संघटनेने घेतली खासदार विखे ची विविध प्रश्नी भेट.

 


पारनेर प्रतिनिधी

    तालुक्यातील विविध प्रश्नासबंधी शिवबा संघटनेच्या पदाधिकारी यानी अहमदनगर येथे खासदार सुजयदादा विखे पाटील यांची भेट घेउन निवेदन दिले. यामध्ये निघोज- चासकरवाडी- अळकुटी रस्ता,पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे,कांदा प्रश्नी तालुक्यातील या विविध प्रश्नी लक्ष वेधले. पावसामुळे पिकांचे खुप नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामा होऊन शेतकरी बांधवाना मदत मिळावी व त्याचप्रमाणे निघोज अळकुटी रस्ता अतिशय खराब झाला असल्याचे निदर्शनास आणून दिले. हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेत आहे. मात्र वेळप्रसंगी खासदार निधीतून हा रस्ता करणार असल्याचे खासदार साहेबांनी सांगितले.


  यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, भाळवणी गट प्रमुख नागेश नरसाळे,विदयार्थी संघटना तालुका उपप्रमुख यश रहाणे,प्रितेश पानमंद,पोपट वरखडे,सोशल मिडिया प्रमुख निलेश वरखडे आदि सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments