अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी

 

पिंपरी जलसेन ग्रामस्थांची महसूलमंत्री ना.विखे पाटलांकडे मागणी

पारनेर प्रतिनिधी चंद्रकांत कदम

   गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांचा शेतीमाल तर काहींचे शेती पाण्याने वाहून गेली आहे. त्यामुळे नुकसानीची सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील विकास प्रतिष्ठान पिंपरी जलसेन यांच्यावतीने महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.


       महसूलमंत्री ना. विखे पाटील मंगळवारी पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी तालुक्यातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले आहेत. ना.विखे पाटील पारनेर येथे आले असता त्यांची माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील विकास प्रतिष्ठान च्या वतीने नुकसान भरपाईची सरसकट मदत मिळावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी पिंपरी जलसेनचे उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, रेवजी कदम, प्रा. प्रवीण काळे सर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या ८ अ उताऱ्याप्रमाणे शेतीचे पंचनामे होतील व सर्व शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळेल असे आश्वासन महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

Post a Comment

0 Comments