अवकाळी पावसाने सोयाबीन गेले वाहून ; वर्गमित्र आले धावून


पारनेर प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या अवकाळी ढगफुटी पावसाने पारनेर तालुक्यातील निघोज येथील युवा शेतकरी मच्छिंद्र जाणकू लामखडे यांचे सोयाबीन पीक कुकडी नदीला पूर येऊन वाहून गेले. त्यांचे अतोनात नुकसान झाले. यावेळी त्यांचे वर्गमित्र मदतीला धावून आले आणि फुल ना फुलांची पाकळी म्हणून वर्गमित्रांनी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्त केली. अडचणीच्या काळात वर्गमित्र धावून आल्याने धीर आला असून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया नुकसान झालेले शेतकरी मच्छिंद्र जाणकू लामखडे यांनी दिली.




निघोज मधील युवा शेतकरी  मच्छिन्द्र जानकू लामखडे यांचे कुकडी नदीला पूर येऊन सोयाबीन वाहून गेले हे वर्गमित्रांना समजले. त्यानंतर मच्छिन्द्र मंजाभाऊ लाळगे (शिवबा विद्यार्थी संघटना अध्यक्ष ), विष्णू सोजे, मारुती कोकाटे यांनी मित्रांना मदतीचे आव्हान केले व ११ हजार रुपयांची  मदत सर्व वर्गमित्रांनी जमा केली. मारुती कोकाटे, सोमनाथ तांबे, मच्छिन्द्र म लाळगे, शंतनू वाघमारे, शरद डेरे, प्रदीप झावरे, विष्णू सोजे, सुमित्रा कवाद, सुदर्शन निघोजकर, प्रकाश रोहिदास वराळ, विकास पठारे,रवींद्र ढवण, दत्तात्रय रखमा खोसे, सोपान घोगरे, तनवीर तांबोळी, दिपक लाळगे, महादेव पठारे, संदीप ठुबे, भाऊराव लहिरे, गणेश ज्ञानदेव ढवण, मुन्नाभाई इनामदार, विशाल कवाद, भरत पवार, गणेश शेटे, सुभाष संपत वराळ, आकाश शेठ पटेल, नवनाथ शेटे, सोनाली घोलप, लहू ढवन, अरुण वाजे, योगेश बाबुराव रसाळ, रमेश प्रभाकर लंके, लहू इरोळे, शंकर रसाळ, सागर कारखिले, शुभांगी वराळ, संतोष सुपेकर, योगिनी बेलोटे, मच्छिन्द् जानकू लामखडे यांना मदत देतानी युवा शेतकऱ्यांने दाखवला मनाचा मोठया पणा आपलाच वर्गमित्र दत्तात्रय रखमा खोसे यांची मुलगी आजारी असल्याचे समजले मिळालेल्या मदतीतील काही रक्क्म त्यानी  आपलाच वर्गमित्र दत्तात्रय खोसे यांना सुपूर्त केली.

Post a Comment

0 Comments