मुख्यमंत्र्यांनी राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा - शिवबा संघटना

 

   संवेदनशील असल्यास कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्या व ओला दुष्काळ जाहीर करा शिवबा संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पारनेर प्रतिनिधी

   पारनेर सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. पिके अक्षरशः पाण्यावर तरंगत आहे. मात्र शासनाला गांभीर्य नाही. नुसते म्हणायला व बोलायला गरीबांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे का? मुख्यमंत्री साहेब नुसते बोलु नका करून दाखवा. तुमचे कृषीमंत्री आमच्या शेतकरी बांधवांची प्रेत पाण्यावर तरंगण्याची वाट पाहतायेत का ? असा सवाल करत राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी राजाला सरसकट मदत देण्यात यावी अशी मागणी शिवबा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याकडे केली आहे.


       मंत्रिमंडळातील मंत्र्यांना ए सी मध्ये बसून ओला दुष्काळ काय समजणार  ?  मुख्यमंत्री साहेब आपण कटपुतळी बनून निर्णय न घेता त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवबा संघटनेच्या वतीने करण्यात आली.याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे,सरपंच सोमनाथ भाकरे,रोहिदास लामखडे,रमेश वरखडे,स्वप्नील लामखडे,शंकर वरखडे,खंडु लामखडे,अंकुश वरखडे,राहुल शेटे,संदीप कवाद,नवनाथ बरशिले,राजु लाळगे,नवशाद पठाण,नागेश नरसाळे,यशराज रहाणे,निलेश नरसाळे,रोहित मोरे,विकास मोरे,शांताराम पाडळे,ठकाराम खोडदे,अनिल गागरे,गणेश चौधरी,युवराज बढे,वैभव गाडिलकर,दत्ता टोणगे,विजय मदगे,नवनाथ येलकर,निलेश कदम,अमोल ठुबे,कैलास घेमुड,तुषार दिघे,संतोष जाधव,संतोष रोकडे,मोहन पवार,निलेश वरखडे,जयराम सरडे,मच्छिंद्र लाळगे सुरज शिरसाट,अविनाश लामखडे,बाबाजी लामखडे आदि सहकार्यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments