वडझिरे मध्ये नवनियुक्त शिवसेना तालुका प्रमुख डॉ.श्रीकांत पठारेंचा सत्कार

 


पारनेर प्रतिनिधी


शिवसेना नेते माजी पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांतजी पठारे  यांची शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल वडझिरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यात आल्या .


प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना वडझिरे गावचे मा.जि.सदस्य राजाराम एरंडे यांनी शिवसेनेला होतकरू,सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जान असणारा नेता तालुका प्रमुख मिळाला म्हणून डॉ.पठारेंचे कौतूक केले. वडझिरे गावचे मा.उपसरपंच जेष्ठ नेते किसनराव चौधरी म्हणाले की, डॉ.पठारें सारखा कोहिनुर हिरा ना.विजयराव औटी साहेबांनी शोधून शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण केले आहे.

वडझिरे गावचे माजी उपसरपंच विवेक वसंतराव मोरे पाटील म्हणाले की, डॉ.श्रीकांत पठारे निष्कलंक व चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे.  महत्वाचे म्हणजे सर्वांना सामावून घेणारे नेतृत्व शिवसेनेला मिळाले. येणाऱ्या काळात डॉ पठारेंना सर्वजण मिळून वडझिरे गावातून ताकद देणार हे आश्वासन यावेळी दिले.


शिवसैनिक महेश शिंगोटे म्हणाले की, पारनेर तालुका हा सुसंस्कृत विचारांचा तालुका आहे. ना.विजयराव औटी साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉ.श्रीकांत पठारे हे पूर्ण तालुका पिंजून काढून  पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवतील. येणारा काळ हा शिवसेनेचा असेल.

युवासैनिक ओंकार एरंडे,गणेश शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेना नगरसेवक राजुशेठ शेख,पी.आय शंकरराव चौधरी,मा.सरपंच पोपटराव शेटे,सुभाषराव सुरुडे, सरपंच निलेश केदारे,सावकार सपकाळ,सुनीलशेठ करकंडे,लहुशेठ चौधरी, बाबाजी लंके टेलर,पंढरीनाथ मोरे, डॉ.बी.आर हांडे,राजाभाऊ मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.गणेश चौधरी,सुरेश दिघे,निवृत्ती निघुट, सर्वच शिवसेना युवासेना शाखा वडझिरे पदाधिकारी व डॉ.श्रीकांत पठारे मित्रपरिवार उपस्थित होता. सर्वांचे आभार शिवसेना शाखाप्रमुख संतोषशेठ रोकडे यांनी  मानले.

Post a Comment

0 Comments