पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पठारवाडी गावचे कार्यसम्राट सरपंच भास्करराव सुपेकर यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. समाजीक उपक्रमांनी साजरा झालेल्या या दुसऱ्या वाढदिवसाला निघोज व परिसरातून सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने पठारवाडीमध्ये सरपंच भास्कर सुपेकर मित्रपरिवराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान शिबाराचे उदघाटन निघोजचे सरपंच सचिन पाटील वराळ यांच्या हस्ते करण्यात आले. ७७ पुरुष व ११ महिलांनी रक्तदान करत सलग दुसऱ्या वर्षी महिलांनी रक्तदान करत वेगळा आदर्श घालून दिला. सेवा संस्थेचे माजी चेअरमन किसन सुपेकर, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, आपली माती आपली माणसं संकल्पनेचे प्रणेते रुपेश ढवण, सुखदेव पठारे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य सुपेकर, संचालक अनिल सुपेकर, ज्ञानदेव पवार, निघोजचे उपसरपंच माऊली वरखडे, पत्रकार दत्ता उनवणे, सुनील पवार, अस्लम शेख, ग्रामपंचायत सदस्य दौलत सुपेकर, शंकर पठारे, कुंडलिक पठारे, नितीन सुपेकर, मेजर संजय सुपेकर, गोरख पठारे, जयसिंग पवार, संदीप सुपेकर, मोहन सुपेकर, गनेश पवार, रहीम मण्यार, निलेश घोडे, मंगेश लाळगे, गंगादादा वरखडे, तुकाराम सुपेकर, सिद्धेश्वर पठारे, विश्वास सुपेकर,आदित्य सुपेकर, अमोल सुपेकर,बबन पवार, तान्हाजी सुपेकर, गोकुळ पठारे, गौरव सुपेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments