कलाध्यापक ज्ञानेश्वर कवडे यांना अक्षर गौरव पुरस्कार जाहीर

 

पारनेर प्रतिनिधी 
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर या विद्यालयाचे कलाशिक्षक श्री ज्ञानेश्वर रामदास कवडे यांना राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे संयोजक अमित भोरकडे यांच्याकडून कवडे सरांना नुकतेच पुरस्कार निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे.

         28 व 29 मे 2022 रोजी हे संमेलन पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट विविध अक्षर कलांमध्ये हातखंडा असणाऱ्या अक्षर कलाकारांचे प्रात्यक्षिक व सर्व अक्षर कलाकारांचा अक्षर गौरव होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या अक्षर संमेलनासाठी अक्षर प्रेमी हजेरी लावणार आहेत. संमेलन अध्यक्ष संजय इंगळे, सहसचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते हा अक्षर गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
      कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी.डी.खानदेशे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, विश्वस्त सिताराम खिलारी, विश्वस्त जयवंत रामनाथ वाघ, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य राहुल भैय्या झावरे, जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले, उपप्राचार्य संजय कुसकर, पर्यवेक्षक अंकुश अवघडे व सर्व शिक्षक बंधू भगिनी मित्र परिवार यांनी कवडे यांचे अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

0 Comments