कुरुंद येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताह

 


कुरुंद तालुका पारनेर येथे आजपासून अक्षय तृतीया निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन रोकडेश्वर मंदिर कुरुंद येथे करण्यात आले आहे.बुधवार 27 एप्रिल ते 4 मे पर्यत आयोजन असून, सप्ताहाचे हे 13 वे वर्ष असून यामध्ये काकडाभजन, पारायण, प्रवचन, हरिपाठ, हरी किर्तन, हरिजागर,महाप्रसाद, याचे आयोजन करण्यात आले आहे,  यामध्ये तुषार महाराज पाबळे, चैताली महाराज उबाळे, अनिताताई महाराज जाधव, गुलाब महाराज करंजुले, सुनीताताई महाराज श्रीराम, आदिनाथ महाराज मांढरे, अरुण महाराज उंबरेकर त्याचप्रमाणे सानप महाराज हिंगोली यांचे काल्याचे किर्तन होणार आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान सप्ताह कमिटी कुरुंद यांच्यामार्फत करण्यात आले आहे सप्ताह यशस्वी होण्यासाठी कुरुंद सप्ताह कमिटी तसेच सर्व ग्रामस्थ महत्त्वाचे योगदान करत आहेत

Post a Comment

0 Comments