पिंपरी जलसेनमध्ये राज्याला दिशा देणारे रत्न घडले - काशीनाथ दाते

 पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रेरणा काळे यांचा पिंपरी जलसेन ग्रामस्थांतर्फे सत्कार


पिंपरी जलसेन 

      स्व. सॉलिसिटर गुलाबराव शेळके, कुलगुरू डॉ एस एन पठाण, पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रेरणा काळे व अनेक रत्न पिंपरी जलसेनच्या मातीत घडले असून त्यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांनी केले.


        पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे नुकत्याच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या प्रेरणा काळे व शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव पिंपरी जलसेन ग्रामपंचायत व सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसंचालक तथा नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब थोरात, पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे होते. यावेळी बोलताना काशीनाथ दाते सर म्हणाले की, पिंपरी जलसेनच्या मातीतील रत्न ज्यांनी राज्याला सहकाराचा आदर्श दिला असे स्व सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितून शिक्षण घेऊन मुंबई याठिकाणी महानगर बँकेची स्थापना करून हजारो युवकांना रोजगार दिला तसेच गरजूंना आर्थिक मदत पुरविली. त्यांचा हाच वारसा त्याचे सुपुत्र ऍड उदय शेळके पुढे खंबीरपणे चालवत आहेत. माजी कुलगुरू डॉ पठाण यांनी देखील गरिबीतून शिक्षण घेऊन नागपूर सारख्या विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम केले. सध्या मुंबई येथे गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून काम करणारे अनिल वाढवणे देखील याच मातीतील असून या सर्वांनी गरिबीतून शिक्षण घेऊन आपले व आपल्या गावचे नाव राज्यात उज्वल केले आहे. त्यांचीच "प्रेरणा" घेऊन प्रेरणा राजेंद्र काळे हिने पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. भविष्यात एवढ्यावरच न थांबता आयएएस, आयपीएस अधिकारी  प्रेरणाने गावचे नाव आणखी उज्वल करावे असे मत काशीनाथ दाते यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ श्रीकांत पठारे म्हणाले की, राजेंद्र काळे हे शेतकरी कुटुंबातील असून शेतीतून उदरनिर्वाह करत असताना आपल्या मुलीला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक बनवले. प्रेरणा हिची जिद्द व चिकाटी पाहता ती भविष्यात खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचेल असे डॉ पठारे म्हणाले. माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठे होण्यासाठी कोणाची तरी प्रेरणा घेणे गरजेचे आहे. प्रेरणा काळे हिने आपल्या आईवडिलांची व थोरामोठ्यांची प्रेरणा घेऊन हे यश मिळवले आहे. 

यावेळी सरपंच सुरेश काळे, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, शिक्षक नेते राया औटी, माजी सरपंच भाऊसाहेब गाडेकर, संतोष थोरात, मीनाक्षी थोरात, माजी उपसरपंच संदीप काळे, बाबाजी वाळुंज, दगडू बोरुडे ,अश्फाक शेख, परशुराम काळे, विवेक थोरात, दत्तात्रय थोरात,फक्कड शेळके, दीपक बोरुडे, बबन घेमुड, दगडू थोरात, मुकिंदा काळे ,सखाराम थोरात, विलास घेमुड, गुलाब थोरात, विठ्ठल आडसरे ,अंबादास काळे, देवराम घेमूड, रंगनाथ वाढवणे, गणेश वाढवणे, गणेश पुणेकर, ऋषिकेश काळे, तुषार काळे, प्रतीक थोरात, किरण वाढवणे ,प्रवीण घेमूड, शैलाताई काळे ,राजू काळे, सागर बोरुडे, हिरामण थोरात, प्रदीप आडसरे, सोमनाथ आडसरे, पोपट थोरात, राजन शेख, दादाभाऊ बोरुडे सर, रामदास बोरुडे, निवृत्ती थोरात, शेख मॅडम, छाया काळे, सिंधू काळे, संगीता थोरात , ग्रा.स. अश्विनी भिंगारदिवे, पिरताजी कदम, पोपट वाढवणे, ठुबे सर, शंकर बोरुडे, पंढरीनाथ थोरात, मारुती थोरात ,धनंजय थोरात, सचिन वाढवणे ,शिवाजी थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पठारे सर यांनी केले तर आभार सरपंच सुरेश काळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments