ग्रामपंचायत व सेवाभावी संस्थेच्या वतीने होणार सन्मान
पारनेर प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या पिंपरी जलसेनची कन्या प्रेरणा राजेंद्र काळे व शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पिंपरी जलसेन ग्रामपंचायत व सेवा भावी संस्थेच्या वतीने शनिवारी (दि.१२) सकाळी ९ वाजता पिंपरी जलसेनमध्ये आयोजित केला आहे.
राज्यासह देशातील विविध स्तरांवर उज्वल यश मिळवून गावचे नाव उज्वल करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा व ऊर्जा देण्यासाठी पिंपरी जलसेन ग्रामपंचायत व सेवा भावी संस्थेच्या वतीने या मान्यवरांचा व विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. हा सन्मान सोहळा पिंपरी जलसेन येथील रोकडोबाच्या मंदिरामध्ये शनिवारी (दि. १२) रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या सोहळ्याला ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपरी जलसेन ग्रामपंचायत व सेवा भावी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments