कृषिकन्येच्या निवडीने पालकांमध्ये आनंदाचे वातावरण
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील प्रेरणा राजेंद्र काळे हीची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. निवडीबद्दल पिंप्री जलसेन ग्रामस्थांनी प्रेरणाचे अभिनंदन केले.
प्रेरणा काळे ही पिंप्री जलसेन येथील राजेंद्र जयवंत काळे यांची कन्या. प्रेरणा ने इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. प्रेरणा हिची मार्च २०१७ राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा पासून या प्रवासाची सुरुवात झाली. २०१९ ची तलाठी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन पारनेर येथे २०२१ मध्ये तलाठी या पदावर रुजू झाली. त्यानंतर २०१९ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची अ राजपत्रित गट ब दुय्यम सेवा पूर्व परीक्षा झाली होती. त्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच लागला असून राज्यातील महिलांमध्ये ५० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.
निवडीबद्दल पिंप्री जलसेन मधील ग्रामस्थांनी प्रेरणा हिचे अभिनंदन करून कौतुक केले.
0 Comments