कुरुंद ता- पारनेर येथे आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कुरुंद तर्फे गावांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. गावातील ग्रामसेवक मॅडम, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका, आरोग्य सेविका, महिला स्वयं सेविका, अंगणवाडी सेविका, तसेच महिला कामगार या सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. महिलांना फेटा बांधून सन्मानचिन्ह देण्यात आले.
महिलांना त्यांच्या कामामध्ये उत्स्फूर्तता निर्माण व्हावी यासाठी ग्रामपंचायतिने त्यांचा सन्मान केला. सदस्य कैलास कोठावळे यांच्या तर्फे महिलांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात तंटामुक्ती अध्यक्ष कर्डिले सर यांनी सूत्रसंचालन केले त्याचप्रमाणे निलेश शेंडगे, मुख्याध्यापिका यादव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ग्रामसेविका म्हेत्रे मॅडम यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास सरपंच गणेश मधे, उपसरपंच नंदा कारखिले, सदस्य कैलास कोठावळे, चेतन उबाळे कल्पना भोसले, प्रमिला शेंडगे, शोभा खेमनर, सुरेखा थोरात,
मा.सरपंच शाहूराव उबाळे,दशरथदादा कुलाळ,चेअरमन बाबासाहेब कोतकर,दीपक उबाळे,दत्ता तितर, कैलास उबाळे,अजित यादव,संतोष जाधव व गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
0 Comments