आ. डॉ सुधीर तांबेकडून पिंप्री जलसेनच्या विद्यालयास संगणक भेट

 


पिंप्री जलसेन 

नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथील ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयास दोन संगणक संच भेट देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत आ.तांबे यांचे आभार मानले.
       ग्रामीण भागात देखील शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात. विद्यार्थ्यांना इंटरनेट युगाची माहिती मिळून दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने आ. डॉ सुधीर तांबे यांनी या विद्यालयास २ संगणक संच भेट दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट युगाची माहिती मिळण्यास मदत होणार असून डिजिटल शिक्षण पद्धती अवलंबण्यासाठी उपयोग होणार आहे. आ. तांबे यांनी विद्यालयास सगणक संच भेट दिल्याबद्दल संजीवनी शिक्षण संस्थेचे संचालक जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, संस्थेचे अयाध्यक्षा गीतांजली ताई शेळके, यांसह विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सपकाळ, शिक्षक दादाभाऊ बोरुडे, विजय पठारे, चंद्रशेखर ठुबे, शिक्षिका लैला शेख, गणेश पुणेकर, शैलेंद्र गायकवाड व सर्व विद्यार्थ्यांनी आ. डॉ सुधीर तांबे यांचे आभार मानले.


माजी विद्यार्थिनीकडून विद्यालयासाठी फळा भेट
ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व सध्या पारनेर तालुक्यातच तलाठी म्हणून नोकरी करत असलेली प्रेरणा राजेंद्र काळे व बंधू तुषार राजेंद्र काळे यांनी स्वखर्चातून विद्यालयासाठी ६ हजार रुपये किमतीचा खडू फळा भेट दिला आहे.

Post a Comment

0 Comments