डॉ श्रीकांत पठारेंच्या राजकीय वाटचालीमध्ये यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी डॉ. पद्मजा पठारे




"प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा भक्कम हात असतो" ही म्हण सर्वत्र प्रचलित आहे. यामध्ये  महिला ही कधी-कधी कुणाची पत्नी, आई, बहीण असू शकते. अश्याच एक यशस्वी पुरुषाच्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या परंतु प्रसिद्धीच्या झोतात न येता देखील समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेवी महिलेबाबत आज या ठिकाणी लिहीत आहे. लिहिण्याचे विशेष कारण म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे सामाजिक काम प्रकाशझोतात आणण्याचा हा छोटासा प्रयत्न...


      डॉ. पद्मजा श्रीकांत पठारे या स्वामी समर्थ बँकेच्या संचालक असून शिवसेना पारनेर तालुकाप्रमुख तथा पारनेर पंचायत समिती सदस्य व ओंकार मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलचे संचालक डॉ श्रीकांत पठारे यांच्या त्या पत्नी आहेत. डॉ श्रीकांत पठारे हे कॉलेज जीवनापासून सामाजिक कामांमध्ये आवड असणारे व्यक्तिमत्व. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांसाठी अनेकदा आंदोलने केले. त्यानंतर पारनेर तालुक्यातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. त्यांच्या या सामाजिक कामामुळे त्यांच्या पारनेर तालुक्यातील मूळ वडुले गावात त्यांना बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य करण्यात आले. पारनेर येथे ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून पारनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील हजारो रुग्णांना अल्पदरात, मोफत वैद्यकीय सेवा पुरविली व आता देखील पुरवीत आहेत. कोव्हीडच्या काळात स्वतःचे खासगी हॉस्पिटल असताना देखील रुग्णांना मोफत उपचार मिळावे या हेतूने "पूर्णवाद भवन" येथे डेडिकेटेड कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून सुमारे साडे सात हजार अतिशय सिरीयस रुग्णांवर यशस्वी उपचार केले. कोव्हीड रुग्णांवर उपचार करत असताना डॉ श्रीकांत पाठरेही दोन वेळा कोव्हीड पॉजीटिव्ह आले. त्यानंतर तालुक्यातील सुमारे ३०-३२ गावांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून जवळपास साडे सहा ते सात हजार रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार केले. हे सर्व सामाजिक काम करत असताना त्यांच्यासोबत सावलीसारख्या उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा श्रीकांत पठारे या नेहमीच समाज माध्यमे व प्रसिद्धी पासून बाजूला राहिल्या. सामान्य नागरिकांसोबत असलेली बांधिलकी टिकवत असताना समाजामध्ये हजारो लोकांना जोडण्याचे काम डॉ पद्मजा पठारे यांनी केले. ४ मार्च हा डॉ पद्मजा पठारे यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.


       एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात व आधार असतो ही म्हण  डॉ पद्मजा पठारे यांनी तंतोतंत खरी करून दाखविली. डॉ श्रीकांत पठारे यांनी आतापर्यंत वडुले गावचे ग्रामपंचायत सदस्य,पंचायत समितीचे सदस्य, शिवसेना तालुकाप्रमुख तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक संस्था व समित्यांचे सदस्य पद व अनेक मुख्य पदे भूषविली.डॉ पठारे हे समाजामध्ये काम करत असताना ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून रुग्णांची सेवा करून रुग्णांना मायेचा आधार व मानसिक धैर्य देण्याचे काम डॉ पद्मजा पठारे यांनी केले. कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून पती पत्नींना कोव्हीड रुग्णांची सेवा केली.डॉ श्रीकांत पठारे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रात्रीचा दिवस करून २४ तास कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करण्यास डॉ पद्मजा पठारे यांनी प्राधान्य दिले. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देखील मोफत उपचार देण्यासाठी व महिलांच्या मुख्य समस्या सोडविण्यासाठी डॉ. पद्मजा पठारे या नेहमीच अग्रेसर होत्या. समाज माध्यमांवर प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या परंतु सर्वसामान्यांच्या हृदयात घर केलेल्या डॉ पद्मजा या वैद्यकीय सेवेखेरीज महिलांसाठी समाजामध्ये काम करत आहेत. 

       सध्याच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात समाजासाठी आपला अमूल्य वेळ व पैसे खर्च करण्यासाठी सहसा कोणी धजावत नाही. अपवादात्मक कोणी समाजसेवेत आलाच तर त्याला स्वतःच्या घरातून विरोध होतो. परंतु डॉ श्रीकांत पठारेंच्या बाबतीत काही वेगळंच पाहायला मिळत आहे. स्वतःचे खासगी हॉस्पिटल असताना देखील फक्त जनतेला मोफत उपचार मिळावे म्हणून कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून कोव्हीड रुग्णांना मोफत उपचार देणारे डॉ श्रीकांत पठारे हे राज्यातील एकमेव डॉक्टर ठरले. आणि त्यांच्या याच समजेवी वृत्तीला भरभरून साथ दिली ती त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा यांनी. डॉ पद्मजा यांच्याबद्दल बोलण्यासारखं, लिहिण्यासारखं खूप आहे. शेवटी फक्त एकच सांगेल यशस्वी पुरुषाच्या मागे भक्कम साथ देणाऱ्या स्त्रियांपैकी एक असणाऱ्या व पती पत्नीच्या नात्यात पत्नीची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पडणाऱ्या डॉ पद्मजा पठारे यांचा आदर्श आज समाजातील महिलांनी घेणे गरजेचे आहे.

    स्वामी समर्थ बँकेच्या नवनिर्वाचित संचालक डॉ पद्मजा पठारे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा...त्यांच्या हातून असेच समाजसेवेचे कार्य यापुढे अविरत चालू राहो. त्यांना निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी व आई तुळजाभवानी च्या चरणी प्रार्थना....पुनश्च वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा......



लेखक - चंद्रकांत कदम (पत्रकार)

   ९४२०४६३९२८

Post a Comment

0 Comments