शिवजयंती निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत हमालवाडीची शिवानी शिंदे प्रथम


 

कुरूंद प्रतिनिधी

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सदैव वेगवेगळे उपक्रम राबवणारे कुरुंद ग्रामपंचायत सदस्य निलेश शेंडगे व आमदार निलेश लंके प्रतिष्ठान कुरुंद यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी छत्रपतींचे चित्र काढण्याची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून प्रथम क्रमांक शिवानी पांडुरंग शिंदे जिल्हा परिषद शाळा हमालवाडी हिने पटकावला, तर द्वितीय क्रमांक वैष्णवी अमित उघडे श्रीरामपूर, तसेच तृतीय क्रमांक संकेत संतोष कर्डिले  कुरुंद यांनी पटकावला.


       सर्व विजेत्यांचे ग्रामपंचायत सदस्य निलेश शेंडगे, आमदार निलेश लंके, परीक्षक पियुष वेदपाठक सर, रवी कुरंदळे सर, दत्ता तितर सर यांनी अभिनंदन केले. यावेळी विजेत्या स्पर्धकास प्रमाणपत्र व बक्षिसे देण्यात आली तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत पारनेर तालुका तसेच इतर तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.


Post a Comment

0 Comments