सांगवी सुर्या येथे युवा उद्योजक ईश्वर आढाव यांच्या "हॉटेल समाधान" चा शुभारंभ...
पारनेर प्रतिनिधी
सध्या तरुणांना रोजगाराच्या संधी कमी असून युवकांनी उद्योग व व्यवसायाकडे वळून आपले भवितव्य घडविले पाहिजे असे मत पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील सांगवी सुर्या येथील युवा उद्योजक ईश्वर आढाव यांच्या "हॉटेल समाधान" या हॉटेलचा शुभारंभ पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ पठारे म्हणाले की, युवकांना उद्योग व्यवसायात उज्वल भविष्य आहे. उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसाय करताना सचोटी व सातत्य गरजेचे आहे. तरुणांनी ते जोपासले तर व्यवसायात भरभराट होईल असेही डॉ पठारे बोलले.
यावेळी गांजिभोयरे ग्रामपंचायत सदस्य राहुल तामखडे, युवा नेते डी के पांढरे पाटील, प्रशांत निंबाळकर, पत्रकार चंद्रकांत कदम, ईश्वर आढाव, सोन्याबापू भापकर, गजानन सोमवंशी, रामदास कोठावळे, भाऊ झंझाड, चेअरमन राजू पांढरे, भाऊसाहेब आढाव, चंदूशेठ कोठावळे, संदीप रासकर, आदिनाथ कदम, सरपंच, उपसरपंच आदींसह मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments