उद्या धोत्रे बु येथे ३० लाखांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा


बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते होणार भूमिपूजन


पारनेर (प्रतिनिधी)


पारनेर तालुक्यातील धोत्रे बु येथे जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत पूल बांधकाम व रस्ता डांबरीकरणासाठी ३० लाखांची निधी बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांनी मंजूर केला असून या कामांचे भूमिपूजन दाते सर यांच्या हस्ते उद्या बुधवार (दि.२३) रोजी सायंकाळी ७ वाजता होणार असल्याची माहिती युवासेना उपतालुकप्रमुख सुभाष सासवडे यांनी दिली आहे.

        जिल्हा वार्षिक योजना ३०५४ सण २०२०-२१ धोत्रे ते मंचरेवस्ती रस्ता पूल बांधकामसह मजबुतीकरण करणे यासाठी १५ लाख व त्याच रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे यासाठी १५ लाख असे ३० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांनी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन सोहळा बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांच्या हस्ते व पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, युवासेना तालुकाप्रमुख नितीन शेळके, कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे, पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी, पंचायत समिती सदस्य ताराबाई चौधरी, शिवसेना शहरप्रमुख निलेश खोडदे, पारनेर नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवक युवराज पठारे, भाजप उपजिल्हाध्यक्ष सुभाष दुधाडे, ढवळपुरी चे सरपंच डॉ राजेश भनगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत योगावस्ती, धोत्रे बु !! येथे बुधवारी दि २३ सायंकाळी ७ वाजता होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन धोत्रे चे सरपंच वनिता कसबे, युवासेना उपतालुकप्रमुख सुभाष सासवडे, सेवा सोसायटीचे चेअरमन हारकुशेठ भिटे यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.



 

Post a Comment

0 Comments