पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण शुक्रवारी जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना. विजयराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती सेवा संस्थेचे चेअरमन किसनराव सुपेकर व संचालकांनी दिली आहे.
पठारवाडी सेवा संस्थेची स्वमालकीची नूतन इमारत बांधकाम करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. १४ जानेवारी रोजी सकाळी १० वा. महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख यांच्या हस्ते होणार आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष ना.विजयराव औटी यांच्या अध्यक्षतेखाली हा लोकार्पण सोहळा होणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदयराव शेळके, बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले,
शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद सदस्या उज्वला ठुबे, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, पठारवाडीचे सरपंच भास्कर सुपेकर, सहाय्यक निबंधक गणेश औटी, तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, जिल्हा बँक इन्स्पेक्टर रंगनाथ गायकवाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा संस्थेचे संस्थापक चेअरमन किसनराव सुपेकर,व्हा चेअरमन महादू पठारे, चेअरमन सुखदेव पठारे, व्हा चेअरमन संतोष सुपेकर, संचालक पिराजी पवार, भानुदास पठारे, लहू बोदगे, सत्यभामा सुपेकर, जालिंदर पठारे,विठोबा पठारे, बाबू सुपेकर, नामदेव वेताळ, भीमाबाई गजरे,बाबाजी पठारे,जनार्धन पवार, बारकू सुपेकर, जयवंताबाई सुपेकर, सदाशिव सुपेकर, सचिव डी सी पुंड आदींनी केले आहे.
0 Comments