पिंपरी जलसेन विद्यालयातील ४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत

 

पारनेर (चंद्रकांत कदम)

     पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील ग्रामीण बहुद्देशीय माध्यमिक विद्यालयातील ४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये पात्र झाले आहेत. याबाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित ८ वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ चा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालयातील गायत्री संदीप अडसरे (जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये ६१ क्रमांक), साक्षी राजेंद्र कदम (जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये ९७ क्रमांक), समृद्धी मल्हारी रेपाळे (जिल्हा गुणवत्ता यादीत १६४ क्रमांक) व तनुजा गणेश काळे (तालुका गुणवत्ता यादीत ३ क्रमांक) असे उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे या विद्यालयातील जिल्हा व तालुका यादीत येणारे सर्व विद्यार्थी या मुली आहेत.   त्यांनी विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा पुढे नेली आहे. त्याबद्दल पिंपरी जलसेन ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थिनिंचे अभिनंदन करण्यात आला. यावेळी सत्कार करून कौतुक देखील करण्यात आले.


विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संजीवनी शिक्षण संस्था व  ग्रामीण बहुउद्देशीय माध्यमिक विद्यालय या संस्थेच्या अध्यक्षा गीतांजली ताई शेळके, सचिव रामचंद्र बोरुडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा महानगर बँकेचे अध्यक्ष उदयदादा शेळके, पिंपरी जलसेनचे सरपंच सुरेश काळे, उपसरपंच वर्षा पानमंद, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. या विद्यार्थिनींना विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सपकाळ, शिक्षक दादाभाऊ बोरुडे, विजय पठारे, चंद्रशेखर ठुबे, शिक्षिका लैला शेख आदींचे मोलाचे मार्गदर्शन  व गणेश पुणेकर, 
शैलेंद्र गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments