राज्य मराठी पत्रकार संघाकडुन टाकळीढोकेश्वरला आरोग्य सप्ताहाचे आयोजन...
पारनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पारनेर शाखा यांचे वतीने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामिण रुग्णालया मधे आरोग्य अधिकारी डाॅ.सतीश लोंढे व सर्व स्टाफने या यासाठी विशेष सहकार्य केले.
या वेळी पारनेर तालुक्यातील प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक मिडीया मधील पत्रकारांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.यामधे पत्रकारांच्या रक्त ब्लडप्रेशर,शुगर,आदींसह विविध तपासण्या करण्यात आल्या. या वेळी सर्व पत्रकारांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कॅलेंडर व स्मरणिका देण्यात आली.राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव व पारनेर तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली या वेळी सहविचार सभा घेण्यात आली. यामधे पत्रकारांनी संघटनेच्या वाढीच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा केली.त्यानंतर ख्रिस्मस नाताळ निमीत्त उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या निवासस्थानी फराळ व स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.यावेळी टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश लोंढे,संघटनेचे उपाध्यक्ष विनोद गायकवाड,शिरीष शेलार,एकनाथ भालेकर,सचिव राम तांबे, सहसचिव बाबाजी वागमारे, पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, प्रसिध्दिप्रमुख श्रीनिवास शिंदे, संपर्कप्रमुख संजय मोरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तालुका अध्यक्ष पोपट पायमोडे, वृक्षमित्र पत्रकार लतिफ राजे,पत्रकार सदानंद सोनावळे,रामदास नरड, संतोष कोरडे, गंगाधर धावडे, विजय रासकर, निघोज परिसरचे शहराध्यक्ष सागर आतकर, पत्रकार आनंदा भूकन, गणेश जगदाळे आदींसह प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी हजर होते.
यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हासचिव तथा तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना त्यांच्या चांगल्या कामासाठी वाढदिवसानिमीत्त दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांचे मार्गदर्शन व सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांचे नियोजनाखाली राज्य मराठी पत्रकार संघ आज एका वेगळ्या उंचीवर पोहचला असुन, पत्रकारांची काळजी वाहणारा राज्य मराठी पत्रकार संघासारखा सक्षम पत्रकार संघ कुठेही पहावयास मिळत नसल्याचे दत्ता गाडगे म्हणाले.राज्य मराठी पत्रकार संघ राज्यातील सर्वात मोठा व सक्षम संघटना आहे.पत्रकारांच्या प्रत्येक सुखदु:खामधे राज्य मराठी पत्रकार संघ हि संघटना धावुन येते व मदतही करते असे सांगीतले.पारनेर तालुक्यामधे वसंत मुंडे व विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन केले. सर्व प्रिन्ट व इलेक्ट्राॅनिक मिडीयाचे सर्व पत्रकारांनी आरोग्य सप्ताहा मधे हजेरी लावत आरोग्य तपासणी करुन घेत उस्फुर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.ग्रामीण रुग्णालया मधे झालेल्या आरोग्य तपासणी मधे सर्वच पत्रकारांचे आरोग्य निरोगी असल्याचे सांगत पत्रकारांना टाकळीढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डाॅ.सतिश लोंढे यांनी दिर्घायुष्य व चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच नविन वर्षामधे आरोग्य सप्ताहाचे आयोजन करत आरोग्य तपासणी करुन घेत पत्रकारांनी एक चांगला उपक्रम राबविला असल्याचे वक्तव्य आरोग्य अधिकारी डाॅ.सतीश लोंढे यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
| राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरचे आयोजित आरोग्य सप्ताहामधे पत्रकारांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य अधिकारी डाॅ.सतिश लोंढे, पत्रकार सघटनेचे अध्यक्ष दत्ता गाडगेसर व उपस्थित पत्रकार. |
0 Comments