पारनेर प्रतिनिधी
डॉ श्रीकांत पठारे व मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित पारनेर तालुक्यातील मोफत महाआरोग्य सर्वरोगनिदान शिबिरात सुमारे साडे पाच हजार रुग्णांना मोफत उपचार दिले असल्याची माहिती पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी दिली.
कोव्हीडच्या काळात गेल्या २ वर्षांपासून ग्रामीण भागातील एसटी बस बंद असल्याने मुख्य दळणवळणाचे साधन नसल्याने पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी शहराच्या ठिकाणी येणे शक्य होत नव्हते. त्यातच २ वर्षांपासून सर्वच उद्योग व कामधंदे ठप्प असल्याने नागरिकांना दैनंदिन कामधंदे व रोजंदारी मिळणे कठीण झाले आहे. अल्पशा रोजंदारीवर कसा बसा घरखर्च भागविणाऱ्या गोरगरिबांना जर वैद्यकीय उपचाराची गरज पडली तर त्यांच्याकडे पैसे नाहीत हीच सर्वसामान्य नागरिकांची गरज ओळखून पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गटातील ३१ गावांमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबीर, मोफत उपचार , मोफत नेत्रतपासनी व उपचार शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात सुमारे साडे पाच हजार रुग्णांनी मोफत उपचार घेतले असून सुमारे ४२० रुग्णांनी डोळ्यांचे ऑपरेशन अल्पदरात करून घेतले आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देखील नागरिकांना उपचार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. गेल्या २ कोरोनाच्या लाटेमध्ये तालुक्यातील सुमारे सहा ते साडे सहा हजार रुग्णांवर आम्ही प्रशासनाच्या मदतीने मोफत उपचार केले असून यापुढील काळात देखील जनतेच्या सेवेत राहणार असल्याचे डॉ श्रीकांत पठारे यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात पारनेर तालुक्यातील ३१ गावांमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबीर आयोजित केले होते. शिबिरादरम्यान अनेक गावांतील गोरगरीब पैश्यांअभावी उपचारापासून वंचित असल्याचे दिसून आले. त्या रुग्णांना शिबारातून मोफत उपचार केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान आम्हास पहावयाला मिळाले आहे. यापुढील काळात अश्याच प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील रुग्णांना उपचार देणार असल्याचे डॉ श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
खासगी दवाखाना असताना देखील मोफत उपचार करणारा राज्यातील एकमेव डॉक्टर
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत खासगी दवाखान्यात रुग्णांची उपचारासाठी लाखोंची बिले झाली होती. आशा परिस्थितीत स्वतःचा खासगी दवाखाना असताना देखील कोव्हीड रुग्णांना मोफत उपचार डॉ श्रीकांत पठारे, डॉ पद्मजा पठारे व त्यांच्या टीम ने केले आहे. खासगी दवाखाना असताना देखील कोव्हीड रुग्णांना मोफत उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे कुटुंबीय राज्यात एकमेव असल्याचे राज्यभरातून बोलले जात आहे.
तरुणांमध्ये डॉ श्रीकांत पाठरेंचे आकर्षण
डॉ श्रीकांत पठारे हे सामाजिक काम करत असताना कुठल्याही अपेक्षेशिवाय काम करत आहेत. त्यांच्या या कामावर प्रभावित होऊन तालुक्यातील अनेक तरुण त्यांच्याशी जोडले गेले आहेत. कोव्हीड काळात रुग्णांवर उपचार करत असताना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी वाढलेली जवळीक यातूनच त्यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून तरुणांची लक्षणीय उपस्थिती व सुमारे १० हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यातून डॉ पठारे यांची समाजातील वाढत असलेल्या लोकप्रियतेची प्रचिती तालुक्यातील जनतेला आली आहे.
0 Comments