पारनेर चंद्रकांत कदम
पिंपरी जलसेन येथील बसथांब्यासाठी जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून २ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांनी दिली.
पिंपरी जलसेन येथे बसथांब्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. येथे प्रवाशांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसांत बसची ची वाट बघत पावसात उभे राहावे लागत होते. यासाठी पिंप्री जलसेनच्या शिवसेनेच्या वतीने डॉ श्रीकांत पठारे यांच्या मार्फत जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. दाते सर यांनी १५ व्या वित्त आयोग (२०२०-२०२५) या योजनेअंतर्गत पिंपरी जलसेन येथील बसथांब्यासाठी २ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याच्या प्रशासकीय मान्यता झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते यांनी दिली.
दाते सर यांनी शिवसैनिकांच्या मागणीवरून नुकतेच पिंपरी जलसेन येथील दशक्रिया विधी घाटासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्यापाठोपाठ बसथांब्यासाठी २ लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे. या विकासकामांसाठी पारनेर पंचायत समितीचे सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी दाते सरांकडे पाठपुरावा केला होता. यामुळे दशक्रिया विधी घाटासह ग्रामस्थांचा बसथांब्याचा प्रश्न सुटला असल्याने पिंप्री जलसेनमधील विद्यार्थी, शिवसैनिक तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी काशीनाथ दाते सर यांचे आभार मानले.
0 Comments