पुणेवाडीच्या रस्त्यासाठी १५ लाख व पाण्याच्या टाकीसाठी ६ लाखांचा निधी मंजूर


 


डॉ श्रीकांत पठारे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद सभापती काशीनाथ दाते सरांच्या निधीतून मंजूर

पारनेर चंद्रकांत कदम

पारनेर तालुक्यातील पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी या रस्त्यासाठी १५ लाख रुपये तर पुणेवाडी येथील भैरवनाथ मंदिराच्या पाण्याच्या टाकीसाठी ६ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांनी मंजूर केला आहे. या कामासाठी पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी दाते सरांकडे पाठपुरावा केला होता.

       पारनेर तालुक्यातील बहुतांश नागरिकांचे कुलदैवत व जागृत देवस्थान म्हणून महाराष्ट्रात पुणेवाडीच्या भैरवनाथाची ओळख आहे.  पारनेर पासून ६ ते ७ किमी अंतरावर असणाऱ्या या देवस्थानाच्या ठिकाणी महाराष्ट्र भारतातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी हा रस्ता खराब झाला असल्याने नागरिकांना व भाविकांना येण्याजाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. तसेच कुलदैवत भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असून यात्रेच्या काळात पाण्याचा तुटवडा भासत असल्याने पुणेवाडीच्या ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामासाठी व पाण्याच्या टाकीसाठी पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्याकडे मागणी केली. काशिनाथ दाते सर यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भैरवनाथ मंदिर येथे पाण्याच्या टाकीसाठी ६ लाख रुपयांचा निधी व पुणेवाडी फाटा ते पुणेवाडी रस्त्याच्या कामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या दोन्ही कामांमुळे भाविकांना व नागरिकांना येण्या जाण्याच्या मुख्य प्रश्न व पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.निधी मंजूर करून दिल्याबद्दल पुणेवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते व पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments