पुणेवाडी येथील दत्तमंदिराच्या सभामंडपसाठी साडे तीन लाखांचा निधी मंजूर

 



जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांच्या निधीतून व पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर

पारनेर - प्रतिनिधी

      पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पुणेवाडी येथील दत्तमंदिराच्या सभामंडपसाठी जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांच्या निधीतून व पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या प्रयत्नातून साडे तीन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पुणेवाडी ग्रामस्थांनी दिली.


       पुणेवाडी येथील दत्तमंदिराच्या सभामंडपसाठी निधीची गरज असल्याची मागणी पुणेवाडी येथील ग्रामस्थांनी डॉ श्रीकांत पठारे यांच्याकडे केली होती. त्यासाठी डॉ श्रीकांत पठारे यांनी पुणेवाडी च्या ग्रामस्थांसहित जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सर यांची भेट घेऊन सभामंडपसाठी निधीची मागणी केली. याबाबत दाते सर यांनी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून निधी मंजूर करून आणला असून या सभामंडप साठी साडे तीन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पुणेवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर व पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments