लोकनेते आमदार निलेश लंके यांनी दिला निघोजच्या विकासकामांना ६५ लाखांचा निधी

 जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांनी केला होता पाठपुरावा

सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ वरखडे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी मानले आ. लंके यांचे आभार


पारनेर  प्रतिनिधी

आमदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई संदीप वराळ पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निघोज व परिसरातील विविध विकासकामांसाठी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून याबद्दल सरपंच चित्राताई सचिन वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त केला असून आमदार लंके यांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत. निघोज चेडेवस्ती बंधारा १५ लाख रुपये, निघोज मुकामळा रस्ता १० लाख रुपये, कुंड रोड ते ठुबे वस्ती रस्ता १० लाख रुपये, निघोज गाव‌अंतर्गत रस्ता १० लाख रुपये, चेडे वस्ती ते ठुबे वस्ती रस्ता १० लाख रुपये, निघोज गावातील पथदिवे बसवण्यासाठी १० लाख रुपये अशा प्रकारे ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच ही कामे सुरू होणार आहेत.यापूर्वीही आमदार लंके यांनी निघोज गाव व परिसरातील जनतेच्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत.

Post a Comment

0 Comments